Hernia After C-Section : सी सेक्शननंतर हर्नियाचा त्रास का जाणवतो? काय टाळाल

How to Avoid Hernia after C-Section: प्रसूतीनंतर बाईचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मातेमध्ये शारीरिक आणि मानसिक अधिक बदल घडत असतात. या बदलांचा खूप मोठा परिणाम महिलेवर होत असतो. जर तुमची प्रसूती सी-सेक्शनने झाली तर त्रास वाढतो. कारण यानंतर तुम्हाला टाक्यांचा त्रास सहन करावा लागतोच. पण काही महिलांना या दरम्यान हर्नियाचा त्रास देखील बळावतो. (फोटो सौजन्य – iStock)

​सिझेरिअनने जन्म होणाऱ्या बाळांचे प्रमाण

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारतात 2005 मध्ये सी-सेक्शनद्वारे 8 टक्के बाळांचा जन्म झाला होता, परंतु 2016 मध्ये सी-सेक्शनची प्रकरणे 17 टक्क्यांपर्यंत वाढली. दुसरीकडे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2021 मध्ये 21.5 टक्के मुलांचा जन्म सिझेरियनने झाला होता. भारतातील सिझेरियन प्रसूतीची ही आकडेवारी आहे.

(वाचा – C Section नंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान)

हेही वाचा :  श्रद्धाची झगमगत्या व मऊशार ड्रेसमध्ये कातील लकब, तर रणबीरच्या या गोष्टीवर चाहते घायाळ

​सिझेरिअन केलेल्या महिलेला हर्निया का होतो

जेव्हा शारीरिक भाग जास्त प्रमाणात विकसित होऊ लागतात, तेव्हा हर्नियाची समस्या ठोठावू शकते. हर्नियाची समस्या शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते, परंतु ती पोटावर होण्याची शक्यता असते. खरे तर जेव्हा पोटाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात, तेव्हा हळूहळू हर्नियाची समस्या डोकावू लागते.

(वाचा – मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुलांना दिला महत्त्वाचा धडा, ती एक गोष्ट ठरली आयुष्याची गुरुकिल्ली)

​सिझेरिअननंतर हर्नियाची समस्या किती असते?

सिझेरिअनदरम्यान महिलेचं पोट आणि गर्भाशय याला कट करून गर्भाला बाहेर काढलं जातं. यानंतर महिलेने स्वतःची विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा ते शक्य होतं नाही.

तसेच गर्भधारणेदरम्यान पोट भरपूर वाढलं आणि वजनही वाढलं तर त्याचा परिणाम पोटावर होतो.

लठ्ठपणा आणि सीसेक्शन यामुळे पोटांच्या आताड्यांवर खूप जोर पडतो. यामुळे हर्नियाची समस्या जाणवते.

गर्भधारणेदरम्यान मधुमेह झाल्यासही हा त्रास जाणवतो.

तसेच ओटीपोटाचे टिश्यू कमकुवत झाल्यामुळे हर्निया जाणवतो.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

​महिलांमध्ये हर्नियाची काय लक्षणे दिसतात?

  • पोटदुखी जाणवते जर हर्नियाचा आकार मोठा असेल तर पोटदुखीची समस्या खूप तीव्र होऊ शकते.
  • सिझेरियन प्रसूतीनंतर हर्नियाची समस्या असल्यास पोटावर फुगवटा असल्याचे लक्षात आले.
  • शारीरिक हालचाली करण्यात अडचण जाणवते.
  • खोकताना वेदना जाणवणे.
  • मळमळ किंवा उलट्या.
  • बद्धकोष्ठता समस्या.
हेही वाचा :  छातीत बलगम जमा झाल्यास योगासन करा, घाण मुळापासून जाईल निघून, ३ लोकांनी मात्र ही गोष्ट टाळा

(वाचा – गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? वयानुसार काय जाणवतात समस्या)

​हर्नियाचे सी-सेक्शननंतर कसे निदान होते?

सिझेरियन प्रसूतीमुळे होणारी शस्त्रक्रिया बरी होण्यास वेळ लागतो. खरं तर, प्रसूतीनंतर जखम बरी होण्यासाठी किंवा गर्भाशयाला बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे एंडोमेट्रिओसिस आणि हेमॅटोमा यांसारख्या रोगांवर उपचार करणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टर रुग्णाला शारीरिक निरीक्षणानंतर सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला देतात. हे चाचणी अहवाल हर्नियाच्या मुख्य कारणांची माहिती देतात, ज्यामुळे उपचारात मदत होते.

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​हर्नियावर काय उपचार?

सी-सेक्शननंतर हर्नियावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग शस्त्रक्रिया आहे, परंतु सी-सेक्शनमुळे शस्त्रक्रिया करणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टर रुग्णाला बेल्ट बांधण्याचा सल्ला देतात, जेणेकरून वेदना कमी होतील. दुसरीकडे, जर हर्नियाचा आकार खूप मोठा झाला असेल, तर रुग्णाच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन, शस्त्रक्रिया किंवा लेप्रोस्कोपीचा पर्याय निवडला जाऊ शकतो.

(वाचा – मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?)

हेही वाचा :  हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण... कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

​हर्निया टाळण्यासाठी काय करावे?

सी-सेक्शननंतर महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे

कोणतेही जड सामान उचलणे टाळा

अगदी बाळालाही काही दिवस फार वेळ उचलून घेऊन उभं राहणं टाळा

सी-सेक्शननंतर पोट आवळून बांधा

याकरता बेल्टची मदत घ्या

(वाचा – खरा रोमान्स म्हणजे काय? सुधा मूर्तींच्या या टिप्स पालकांनी मुलांशी नक्की शेअर कराव्यात)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …