श्रद्धाची झगमगत्या व मऊशार ड्रेसमध्ये कातील लकब, तर रणबीरच्या या गोष्टीवर चाहते घायाळ

लव रंजनने (Luv Ranjan) दिग्दर्शित केलेला आणि Ranbir Kapoor व shraddha kapoor ने आपल्या झक्कास अभिनयाने बांधलेला “तू झुठी मैं मक्कार” हा चित्रपट होळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा कपूर तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकताना दिसून येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधून सध्या तरी मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्साह दिसून येत आहे आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे. तसं पाहता या प्रकारच्या सीटकॉम बॉलीवूड चित्रपटांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही पण याला अपवाद ठरला होता सोनू के टीटू की स्वीटी.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता आणि त्याचे डायरेक्टर हे लव रंजनच असल्याने “तू झुठी मैं मक्कार” या चित्रपटाबाबतच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. तू झुटी मैं मक्कारच्या निर्मात्यांनी मंगळवारी रात्री मुंबईत चित्रपटासाठी एक भव्य स्क्रीनिंग कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये बी-टाउनच्या काही नामांकित सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. पण या सर्वात लक्षवेधक लुकमध्ये दिसले ते या सिनेमाचे मुख्य चेहरे श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर..! (फोटो सौजन्य :- योगेन शाह, Instagram – shraddhakapoor)

हेही वाचा :  कोल्हापूर राड्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे कॉलेज विद्यार्थी

श्रद्धा कपूरचे आऊटफिट

श्रद्धा कपूरचे आऊटफिट

‘तू झुटी मैं मक्कार’ सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी श्रद्धा कपूर अत्यंत गोंडस रूपात दिसून आली. यावेळी तिने क्रीम कलरचा पातळ टॉप आणि त्यावर सफेद रंगाचे झगमगत्या टिकल्यांनी सजवलेले आणि शिमरी इफेक्ट देत असलेले मऊ मऊ जॅकेट परिधान केले होते. जॅकेटची झीप ओपन ठेवत ती स्टाईल गोल्स देताना दिसली. या साध्या सिंपल लुकला चार चॉंद लावले ते सिक्विन जॅकेट आणि ब्लू डेनिमच्या कॉम्बिनेशनने. या टॉप आणि जॅकेटला कम्लिट लुक देण्यासाठी श्रद्धाने पेन्सिल बॉटम जीन्स परिधान केली होती.

(वाचा :- ​या पोलिस ऑफिसरच्या फिगर अन् कोरियन मुलींसारख्या नितळ सौंदर्यापुढे बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रीही पार फिक्या)​

ज्वेलरी व शूज

ज्वेलरी व शूज

सिल्वर रंगाचे आऊटफिटला मॅचिंग असे हुप ईयररिंग्स आणि सुंदर अशा शेपमध्ये वाढलेल्या नखांवर बेबी पिंक रंगाची नेलपेंट लावली होती. आऊटफिटला साजेसे असे सफेद रंगाचे मोजडी स्टाईलचे शू बुट्स या लुकची सुंदरता अजूनच द्विगुणित करत होते. याव्यतिरिक्त तिने कोणतेही भरमसाठ दागिने परिधान करणं कटाक्षाने टाळलं होतं.

हेही वाचा :  निसर्गाचा अद्भूत चमत्कार, अवकाशात दिसले एकाच वेळी दोन सूर्य, Video एकदा पाहाच

(वाचा :- 52 वर्षीय तब्बूने स्लिवलेस ब्लाऊजमध्ये केला विशीतल्या तरूणींचा पत्ता कट, अजय देवगणला मिठी मारत दिल्या किलर पोझ)​

मेकअप

मेकअप

या लुकमध्ये श्रद्धाने न्युड लाईट मेकअप ठेवणंच पसंत केलं. तिने केस मोकळे सोडून एका बाजूला घेत साधी सिंपल हेअरस्टाईल केली होती. डेवी फाऊंडेशन, एकदम लाईट रंगाची गुलाबी लिपस्टिक, मस्कारा, हलकंसं काजळ, ब्लॅक शेडमध्ये आयशॅडो लावून मेकअप कम्प्लिट केला होता. श्रद्धाला नैसर्गिक सौंदर्य इतकं लाभलं आहे की भरमसाठ मेकअपची गरजच नाही पण तरीही या मॉर्डन लुकवर तिने परफेक्ट टचअप करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
(वाचा :- International Women’s Day छोट्या शहरातील महिला करोडोंची मालकीण, प्रवास ऐकून भारतातील मोठमोठे बिझनेसमॅनही अवाक्)​

स्माईलने वाढवली सुंदरता

स्माईलने वाढवली सुंदरता

श्रद्धा कपूर ही अशी नाजूक साजूक अभिनेत्री आहे जिचे फक्त पुरूषच नाही तर मुलीही तितक्याच फॅन आहेत. तिचं हसू निरागस आणि गोड आहे जे पाहता क्षणी स्ट्रेस विसरून आनंदी करतं. म्हणूनच अनेक चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतात. नेमकं या लुकलाही तिच्या या गोडशा स्माईलने अधिकच आकर्षक व चेरी ऑन द केक बनवलं.

(वाचा :- ऋतिक रोशनच्या बायकोची मिनी ड्रेसमध्ये एंट्री, फुलाफुलांचा डीपनेक फ्रॉक अन् हाय हिल्सने वाढवलं इंटरनेटचं तापमान)​

हेही वाचा :  बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र

रणबीरला पाहण्यासाठी एकच गर्दी

रणबीरला पाहण्यासाठी एकच गर्दी

या इव्हेंटला श्रद्धा आणि रणबीरने एकमेकांशी ट्युनिंग केलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण श्रद्धाप्रमाणेच रणबीर सुद्धा यावेळी व्हाईट लुकमध्ये दिसून आला. अर्जुन कपूरचा हात पकडून एंट्री मारणा-या रणबीरला कॅमेरात कैद करण्यासाठी एकच गर्दी जमा झाली होती. यावेळी तो सफेद रंगाचा प्लेन टी-शर्टसोबत लाईट ब्लू रंगाच्या डेनिममध्ये दिसून आला. वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर ब्लॅक फ्रेमचा चष्मा घालून तो खूपच डॅशिंग आणि हॅंडसम दिसत होता.

(वाचा मिथुन चक्रवर्तीची सूनबाई जणू फॉरेनची पाटलीनबाईच, यलो डीपनेक व स्लिट कटमधील कातील अदा बघून थांबतील काळजाचे ठोके)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …