बेलाची पोस्ट ठरली आहे ट्रेंडिंग

बेला पुढेही असंही लिहिते की, फॅशनच्या दुनियेमध्ये आता कुठे हिजाब सारख्या पेहरावाला लोकं समजू लागली आहेत. त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. पण आपण हे सुद्धा विसरता कामा नये की मुस्लीम स्त्रियांसाठी हिजाब किती महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरावर आप काय परिधान करावे हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्या त्या स्त्रिचा आहे. तिने पुढेही असाही उल्लेख केला की कित्येक मुस्लीम स्त्रियांवर होणारे अत्याचार तिने पाहिले आहेत आणि म्हणून हिजाब हा महत्त्वाचा पेहराव आहे. (फोटो साभार: istock by getty images और इंस्टाग्राम@ bellahadid)
(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)
मुस्लीम स्त्रियांना भोगावा लागतो पक्षपात

बेलाने आपल्या पोस्ट मध्ये पुढे हे देखील स्पष्टीकरण दिले की, ती हे अजिबातच सांगत नाहीये की फॅशन म्हणून डोके झाकणे बरोबर आहे की चूक, कारण तिला सुद्धा माहित नाही की हिजाब परिधान करणाऱ्या स्त्रियांना स्वत:ला कसे वाटते. तिने हे देखील लिहिले आहे की फॅशनच्या दुनियेत हिजाब आणि हेड कव्हर जास्त दिसणे व स्तुती होणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टीवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे की मुस्लीम आणि दुसऱ्या जाती धर्मातील स्त्रियांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात फॅशन हाउस द्वारा किती चुकीच्या व्यवहाराचा सामना करावा लागतो खासकरून अमेरिका आणि युरोप इंडस्टीमध्ये. (फोटो साभार: इंस्टाग्राम @ bellahadid)
(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)
अनेक ठिकाणी घडतेय ही गोष्ट

यानंतर बेला हदीदने हिजाब बाबत सुरु असणाऱ्या वाद विवादावर आपले मत मांडले आणि तिने हे संपूर्ण प्रकरण स्त्रियांना दाबण्यासाठी होत असल्याचे मत मांडले. ती म्हणाली की, केवळ भारतच नाही तर फ्रांस, क्युबिक, बेल्जियम आणि अन्य दुसरे देश जेथे मुस्लीम स्त्रियांवर भेदभाव होतो अशा देशांना मी आवाहन करते की दुसरा व्यक्ती आपल्या शरीरावर काय परिधान करतो यावर नियंत्रण करण्याचा निर्णयाचा पुनर्विचार करा. स्त्रियांनी काय परिधान करावे आणि काय नाही ही गोष्ट तिला ठरवू द्या, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. खास करून तेव्हा जेव्हा प्रश्न आस्था आणि सुरक्षेशी निगडीत आहे. (फोटो साभार: इंस्टाग्राम @ bellahadid)
(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)
तुम्ही सांगू नका महिलांनी काय करावे व करू नये

‘महिलांना त्या काय शिकू शकतात आणि कोणता खेळ खेळू शकतात हे सांगणे तुमचे काम नाही, विशेषत: जेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेचा प्रश्न येतो. फ्रान्समध्ये हिजाब परिधान करणाऱ्या महिलांना शाळेत खेळताना, पोहताना आणि आईडीच्या फोटोसाठीही हिजाब घालण्याची परवानगी नाही. ते परिधान केल्याने तुम्ही सिव्हिल वर्कर म्हणून किंवा हॉस्पिटलमध्येही काम करू शकत नाही. इंटर्नशिप मिळविण्यासाठी बहुतेक विद्यापीठांचे म्हणणे आहे की हिजाब काढल्यानंतरच संधी मिळेल. हे अतिशय बालिश आहे आणि जग किती इस्लामोफोबिक आहे हे दाखवते. जी विधेयके संमत होणार आहेत किंवा झाली आहेत त्यातही ही गोष्ट दिसून येते असं बेलाचं म्हणणं आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram @bellahadid)
(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)
पुरुषी अहंकार

बेलाने शेवटी असे म्हटले की, हा पुरुषांचा अहंकारच आहे जो त्यांना सतत स्त्रियांना नियंत्रित करण्यासाठी प्रवृत्त करतो. आज 2022 या वर्षात सुद्धा त्यांना स्त्रियांच्या कपडयांबाबत ते स्वत: निर्णय घेऊ शकतात असे त्यांना वाटते याला केवळ आणि त्यांचा पुरुषी अहंकारच कारणीभूत आहे. ही गोष्ट अत्यंत हास्यास्पद असून यातून त्यांचे मागासलेले विचारच दिसून येतात. बेला हदीद एक फेमस मॉडेल असून तिचे फॉलोअर्स कोटींमध्ये आहेत आणि म्हणूनच सध्या तिच्या या मतावरून मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो साभार: istock by getty images और इंस्टाग्राम@ bellahadid)
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)