गौरी खाननं दिल्या लेक सुहानाला डेटिंग टिप्स, शाहरुखच्या एका सवयीवर मात्र आहे थोडी नाराज!

मुंबई :काॅफी विथ करण ७ शोमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान येणार, हे कळल्यावर चाहते उत्सुक होतेच. आता गौरी खान असलेल्या भागाचा प्रोमोही समोर आला आहे. त्यात गौरीबरोबर महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडेही आहेत. गौरी या एपिसोडमध्ये अगदी मनमोकळं बोललीय. कुठलाही आडपडदा न ठेवता.

Koffee With Karan 7 च्या या प्रोमोत करण जोहर गौरीला विचारतो, तू सुहाना खानला डेटिंगच्या काय टिप्स देशील? यावर Gauri Khan म्हणते सुहानानं एका वेळी दोन मुलांना डेट करू नये. हे ऐकून सगळे हसायला लागता. सुहाना आता बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तरचा सिनेमा द आर्चीस सिनेमातून ती बाॅलिवूडमध्ये पाय रोवतेय. या सिनेमात खुशी कपूरही आहे.

जगभरात ३६० तर देशात २०० कोटी क्लबमध्ये ‘ब्रह्मास्त्र’; १० दिवसांतच केली तगडी कमाई

शाहरुखच्या या सवयीवर गौरी नाराज
गौरी खाननं करण जोहरशी बोलताना सांगितलं की किंग खानची एक सवय तिला फारशी आवडत नाही. करण म्हणाला, शाहरुख घरी पार्टी ठेवतो, तेव्हा उत्तम होस्ट असतो. तो पार्टी संपल्यावर जाणाऱ्या पाहुण्यांना कारपर्यंत सोडतो. गौरी म्हणाली, शाहरुखचं हे वागणं अनमोल असेलही, पण मला जरा चिंता वाटत राहते.

आता चिंता वाटण्याचं कारणही गौरीनं सांगितलं. ती म्हणाली, ‘पार्टी सुरू असते तेव्हा शाहरुख जाणाऱ्या पाहुण्यांबरोबर घराबाहेर कारजवळ असतो. घरातले पाहुणे त्याला शोधत राहतात.’ ती म्हणाली, मला आमची पार्टी घराऐवजी रस्त्यावर सुरू आहे, असं वाटतं. तिनं तिच्या आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे नाव दिलं.

Bigg Boss 16: ५०० लोक, ६ महिने, १०० कॅमेरे; बिग बॉसचं घर कोण डिझाइन करतं?

गौरी घेऊन येतेय नवा शो
गौरी खान लवकरच ‘ड्रीम होम्स विथ गौरी खान’ (Gauri Khan new show) हा शो घेऊन येतेय. त्यात सेलिब्रिटींची घरं दाखवली जाणार आहेत. ती घरं गौरीनं डिझाइन केली आहेत.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचं स्क्रीनिंग, करिना कपूर, सैफ अली खान, ऋतिक रोशन यांची उपस्थिती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

आलिया-रणबीरची जादू संपली? बाराव्या दिवशी सिनेमाने केली केवळ इतकी कमाई

मुंबई, 21 सप्टेंबर-   गेल्या कित्येक महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा जादू नाहीसा झाला होता. …

प्रियांका चोप्राची लेक मालतीसोबत फर्स्ट ट्रीप; ‘या’देशात घेतेय सुट्टीचा आनंद

मुंबई, 21 सप्टेंबर-  बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. …