गेल्या 5 वर्षापासून मी आई बनू शकली नाही, नव-याला जडलाय विचित्र छंद

प्रश्न : मी एक विवाहित महिला आहे. मला वाटले होते लग्न झाल्यावर मला एक असा जोडीदार मिळेल जो नेहमी माझ्यासोबत असेल. माझ्यावर खूप प्रेम करेल. पण असे काहीच झाले नाही. मला असा जोडीदार मिळाला जो खूप शांत आहे, खूप कमी बोलतो आणि आजवर कधीच त्याने माझ्यापुढे मन मोकळे केलेले नाही. मी गेल्या पाच वर्षांपासून आई होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण मला माझ्या पतीकडून हवा तसा सपोर्ट मिळत नाही. मी असं नाही म्हणणार की त्यांना मुल नकोय.

त्यांनाही मुल हवंय पण त्यासाठी ज्या विविध गोष्टी कराव्या लागतात त्याबाबत त्यांना रस नाही. जसे की डॉक्टरांनी आम्हाला आयव्हीएफ उपचारांचा मार्ग सांगितला. मी तो करायला तयार आहे पण माझ्या पतीचा यावर विश्वास नसावा कारण तो याकडे अजिबात लक्ष देत नाही. मी काय करू? (गोपनीयतेच्या कारणांमुळे आम्ही व्यक्तीची ओळख घडत करत नाही.)

आमच्यात बॉन्ड नाही

मला सांगायला थोडी लाजच वाटते आहे पण आमच्यात काहीच बॉन्ड नाही. त्यांना माझ्याबद्दल काहीच ममत्व नाही. एक पत्नी म्हणून माझ्या इच्छा त्यांनी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझे लाड केले नाहीत. मला जवळ घेतले नाही. मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हेच कारण आहे की आम्ही नवरा बायको म्हणून अयशस्वी ठरलो आहोत. मला आई व्हायचं आहे पण त्यांना ते कळत नाही आहे.

(वाचा :- Real Stories : माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण..!!)

हेही वाचा :  माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय

ते अध्यात्मिक मार्गाला लागले

हे सगळे सुरु असतानाच एके दिवशी मी त्यांना अध्यात्मिक पुस्तके वाचताना पाहिले. ते काहीतरी असंच वाचत असतील म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण काही वेलने ते टीव्ही वर प्रवचन सुद्धा एकून लागले. मन शांत करण्यासाठी ते हे सगळं वाचत, पाहत असावेत असे मला वाटले. पण माझा भ्रम तेव्हा सुटला जेव्हा ते यांत अधिकाधिक गुंतू लागले. त्यांचे संसाराकडे दुर्लक्ष सुरु झाले. दिवसभर ते एका गुरूच्या ऑनलाईन प्रवचनात गुंग असायचे. मला या गोष्टीचा तिटकारा येऊ लागला आणि आमच्यातले वाद अधिक वाढू लागले. आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागलो.

(वाचा :- माझी कहाणी : नव-याने अक्षरश: भंडावून सोडलंय, भावासोबत बोलणंही गुन्हा वाटू लागलंय, कसा वाचवू या प्रकारातून जीव?)

त्यांनी मला इग्नोर केले

एवढे सगळे होऊन सुद्धा मी एक पत्नी म्हणून त्यांना समजून घेत होती. आपली कर्तव्ये पार पाडत होती. मला आई होण्याचे सुख हवे होते. पण त्यासाठी त्यांच्याकडून काहीच प्रयत्न नव्हते. मी जवळ जाण्याचा प्रयत्न करायची. पण ते मला इग्नोर करायचे. आता कित्येक महिने झाले पण ते काही त्या गुरूच्या प्रभावातून बाहेर आलेले नाहीट. मला भीती वाटते आहे की माझा संसार आता धोक्यात आहे. मी माझ्या पतीला गमावेल आणि माझे आयुष्य सुद्धा उध्वस्त होईल असे मला वाटते. काय करावे हेच कळत नाही आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

(वाचा :- माझी कहाणी: होणारा नवरा व माझी रोज टोकाची भांडणं होतात, फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी आम्ही एकत्र आहोत, ऐकून हादराल)

हेही वाचा :  असे सजवाल घर, तर हवा राहील खेळती - सिद्धार्थने शेअर केलेला घराचा व्हिडिओ पाहा!

जाणकारांचे उत्तर

एआईआर इंस्टीट्यूट ऑफ रियलाइजेशन अँड एआईआर सेंटर ऑफ एनलाइटनमेंटचे संस्थापक रवी म्हणतात की,”तुमची स्थिती खरंच खूप नाजूक आहे. अशा स्थितीमध्ये राहणे दिसते तेवढे सोप्पे नक्कीच नाही. लग्न म्हणजे दोघांचा संसार असतो. एकाने कितीही प्रयत्न केले आणि दुसऱ्याची साथ नसले तर संसारची दोरी ही तुटणारच त्याला पर्याय नाही. तुमची कहाणी जाणून घेता मला असे कळते आहे की तुमचा पती तुम्हाला बिलकुल सपोर्ट करत नाही आहे आणि ही गोष्ट खूप जास्त धोकादायक आहे. अशी नाते टिकण्याचे चान्सेस फार कमी असतात.” पण तुम्ही हार मानू नका, एक ना एक दिवस तुमच्या प्रयत्नाला यश जरूर मिळेल पण यासाठी तुम्हाला योजना बनवून त्यानुसार चालावं लागेल आणि त्यांना समजते त्या भाषेतच समजवावं लागेल.

(वाचा :- काश..! हनीमूनला जाण्याआधी या गोष्टी कोणी मला सांगितल्या असत्या तर माझ्याकडून ‘ही’ एक मोठी चूक कधीच घडली नसती..)

नव-यासोबत बोला

ते पुढे म्हणतात की, “यावर एकच उपाय आहे ते म्हणजे तुम्ही पतीशी स्पष्ट बोलणे आणि त्याला सांगणे की हे असेच सुरु राहिले तर तुम्हाला संसारात राहणे कठीण होऊन बसणार आहे. तुम्ही त्याला समजवा किंवा त्याला रागाने सांगा. पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्या. सोबतच त्यांना याचे परिणाम देखील सांगा. ही एकमेव गोष्ट आहे जी तुमचा संसार वाचवू शकते. शिवाय त्याला हे देखील पटवून द्या की तुमच्यासाठी आई बनणं किती महत्वाचं आहे. आई न बनणं तुमच्या आयुष्यातील सर्वात दु:खाची गोष्ट आहे हे त्याला पटवून द्या.

हेही वाचा :  आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

(वाचा :- काश..! लग्नाआधी मला ‘या’ 5 गोष्टी माहित असत्या तर बरं झालं असतं, प्रत्येक पुरूषाच्या घरी असंच वातावरण असतं का?)

नव-याला विश्वास द्या

या विषयावर प्रिडिक्शन्स फॉर सक्सेसचे संस्थापक आणि रिलेशनशिप कोच विशाल भारद्वाज म्हणतात, “तुम्ही या क्षणी कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. पण यानंतरही मी म्हणेन की संयम आणि धैर्याने काम करा. आपल्या पतीशी बोला आणि त्याला खात्री द्या की तो एकटा नाही. एक जोडीदार म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी सदैव तयार आहात. बरं, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर अध्यात्मिक पुस्तके किंवा प्रवचन ऐकून त्याला मनःशांती मिळत असेल तर ते तुमच्या नात्यासाठी वरदान ठरू शकते. कारण अध्यात्मिक प्रबोधनाची आवड असलेली व्यक्ती या प्रवासातून स्वतः सोबतच तुम्हाला सुद्धा खूप खोलवर समजून घेऊ शकते. त्यामुळे जो निर्णय घ्याल तो खूप विचार करून घ्या.

(वाचा :- नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं’ या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; ‘या’ भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम

Maharashtra Weather News : राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सुरु असतानाच (Mumbai) मुंबई शहर आणि उपनगरातील …

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव …