लग्नानंतर 7 महिन्यांतच बायकोने माझं जीवन मुश्किल करून ठेवलंय, मी काय करू

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे. मी प्रेमविवाह करून लग्न केलं आहे. आम्ही दोघे ऑनलाईन भेटलो, 6 महिन्यांनी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आमच्यात सर्व काही ठीक होते, पण अचानक माझी पत्नी इतकी बदलली आहे की मला समजत नाही की काय करावे? खरं तर, ती प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर ओरडत राहते. मी सहमत आहे की मी काही गोष्टी मॅनेज करण्यात तितकासा चांगला नाहीये, परंतु मला वाटते की सर्वकाही शिकण्यास माणसाला थोडा वेळ लागतो जो ती देतच नाहीये. ती घरात आल्यापासून माझ्या डोक्याची शांती हिरावली आहे. घरात फक्त अन् फक्त वादच होतात.

ती अशी वागते

‘तुझ्या चप्पला उचल, इथे सामान का ठेवलंय, तुला घरच्या कोणत्याही कामात रस नाही’ असं म्हणत ती मला छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून सतत टोमणे मारते. मला तुमच्यापासून लपवायचे नाही की आमच्या लग्नाला आता फक्त 7 महिने झाले आहेत आणि मी कधी कधी स्वतःलाच प्रश्न विचारतो की मी तिच्याशी लग्न करून योग्य केलंय की नाही? लग्नाआधी आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवला नाही हे कदाचित यामागचे सर्वात मोठे कारण असावे. मला माहित नाही की तिची वागणूक कशी आहे? मला समजत नाही मी काय करू? अशाप्रकारे तिने माझे जीवन अक्षरश: कठीण केले आहे. लग्न करून मी पाप केले आहे का? (सर्व फोटो सुचिक आहेत, आम्ही युजर्सनी शेअर केलेल्या कहाणीत त्यांची ओळख उघड करत नाही व प्रत्येक गोष्टीबाबत गुप्ताता पाळतो)

हेही वाचा :  त्या मुलीच्या भुतकाळाची काळी बाजू माहित असूनही मी तिला प्रपोज करण्याचं धाडस केलं, पण पुढे जे झालं ते धक्कादायक

(वाचा :- पैशांसाठी मी अशा माणसाशी लग्न केलं ज्यावर माझं काडीमात्रही प्रेम नव्हतं, पुढे त्याने जे केलं ते ठरलं अनपेक्षितच)

एक्सपर्ट्सचं उत्तर

एआयआर इन्स्टिट्यूट ऑफ रिलायझेशन आणि एआयआर सेंटर ऑफ एनलाइटनमेंटचे संस्थापक रवी म्हणतात की, लग्न हे एक अतिशय नाजूक नाते आहे, ज्यामध्ये पती-पत्नीला एकमेकांना साथ देत आणि अतिशय हुशारीने चालावे लागते. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की हे नाते गुलाबांनी भरलेला एक गुलदस्ता आहे, ज्यामध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही. पण या काळात आपण एक गोष्ट विसरतो की गुलाबाला काटे सुद्धा असतात, जे नीट हाताळले नाहीत तर आपल्याला टोचूही शकतात. वैवाहिक नात्यातही अगदी तसंच असतं. जर तुम्ही दोघांनी ते परफेक्ट बनवण्याच्या दिशेने काम केले नाही तर हे नाते बिघडणार हे नक्की.

(वाचा :- वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पागल असतात मुली, 5 महिलांनी सांगितले मोठ्या पुरूषांच्या प्रेमात का घायाळ असते मन)

तिच्याशी बोलून मनातील गोष्ट जाणून घ्या

तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची बायको तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर सतत ओरडत असते. अशा स्थितीत मी म्हणेन की सर्वप्रथम तुम्ही पत्नीशी बोला. तिला तुमच्याकडून नक्की काय हवे आहे ते तिला विचारा. तिला घरच्या कामात तुमची मदत हवी आहे का किंवा तिला तुमच्या कोणत्या सवयीशी काही समस्या आहे का? की फक्त तुम्ही गोष्टी मॅनेज करत नाही याचा तिला राग येतोय? हे जाणून घ्या. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला तिच्या मनातील खदखद कळेल तेव्हाच तुम्ही त्या गोष्टींवर काम करू शकाल व त्या चुका सुधारू शकाल, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये समस्या निर्माण होत लागल्या आहेत.

हेही वाचा :  माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय

(वाचा :- भयंकर, या कारणासाठी नवरीने तोडलं जुळून आलेलं लग्न, कारण ऐकलं तर चक्कर येऊन पडाल, पोलिसांनी समजावल्यानंतरही अपयश)

तुम्ही आता एकटे नाही, स्वत:ला बदलावं लागेल

मी तुम्हाला हे करण्यास सांगत आहे कारण तुम्ही आता एकटे नाही आहात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जुन्या सवयी थोड्या बदलाव्या लागतील. एवढेच नाही तर तुमच्या पत्नीला हे देखील समजावून सांगा की तुम्हाला माहित आहे की ती घरातील कामे करून थकून जाते. तुम्हालाही त्यांना मदत करायची आहे. परंतु तुम्हाला गोष्टी मॅनेज करण्यात काही अडचणी येत आहेत कारण हे सारं काही तुमच्यासाठी नवीन आहे. पण जर तिने शांततेने शिकवलं तर दोघं मिळून आपण हे करू शकतो याची तिला जाणीव करून द्या.

(वाचा :- माझी कहाणी : वयाच्या 36 शी मध्येही मी सिंगलच आहे, याचे कारण खूपच लाजिरवाणे व विचित्र आहे..!)

तिच्यातील कमतरता शोधत बसू नका

तुमचे सर्व बोलणे ऐकून मी म्हणेन की तुमच्या पत्नीला घरातील कामात मदत करा. ती स्वतः सर्वकाही करत आहे असे तिला वाटू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. कारण तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील. तुमच्या पत्नीमध्ये दोष शोधण्याऐवजी तिची सकारात्मक बाजू पाहण्याचा प्रयत्न करा. ती तिचं माहेर, घरदार, आई-वडिल सोडून फक्त तुमच्यासाठी इथे आली आहे हे समजून घ्या. जर तुम्ही सुद्धा तिच्यासोबत नसाल किंवा लग्नाच्या सात महिन्यांनंतरही तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागलात तर गोष्टी अजूनच चुकीच्या ठरतील. या नात्यात रोमांससोबत समजूतदारपणा वाढवा.

हेही वाचा :  साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने भगवान बुद्धांच्या नावावरून ठेवलं मुलांच नाव, मुलं होईल अतिशय संयमी

(वाचा :- माझी कहाणी : मी एक चांगली आई तर झाली, पण मुलाला आयुष्यात कधीच वडिलांचं सुख देऊ शकणार नाही, कारण आहे हादरवणारं…!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …