माजी विद्यार्थ्याची ‘या’ संस्थेला ८.२५ कोटींची देणगी, गरीब मुलांचा सर्व खर्च केला जाणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शासकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओईपी) माजी विद्यार्थ्याने आठ कोटी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. आशिष अचलेरकर असे या माजी विद्यार्थ्याचे नाव असून, ते सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेला देणगी दिली आहे. या देणगीतून ‘सीओईपी’मध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांचा वसतिगृह, मेस, लॅपटॉप आणि उदरनिर्वाहाचा खर्च केला जाणार आहे.

दर वर्षी सुमारे १५० विद्यार्थ्यांचा खर्च या निधीतून उचलला जाणार आहे. ‘सीओईपी’च्या आजवरच्या इतिहासात देण्यात आलेली ही सर्वाधिक देणगी ठरली आहे. नुकत्याच या करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, लवकरच ही रक्कम माजी विद्यार्थी संघटनेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अचलेरकर गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांनी ‘नीअर यू्’ या कंपनीची स्थापना करून ‘होम सर्व्हिसेस’मध्ये अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये क्रांती घडवली आहे. त्यांनी सुरू केलेल्या अचलेरकर फाउंडेशनतर्फे ही मदत देण्यात आली आहे. अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेच्या सुरुची वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. एस. सुतावणे, संघटनेचे मोहित गुंदेचा, स्टुडंट सपोर्ट क्लबचे प्रा. सुधीर आगाशे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :  उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळा; पालकांचे सुट्टीचे बेत रद्द

‘सीओईपी’चे पन्नास हजारांहून अधिक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशांत विविध हुद्द्यांवर, व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये सध्या शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याचा विडा उचलला आहे. पुढील वर्षभरात शंभर कोटी रुपये गोळा करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.

Good News For Students: सरकारी शाळामध्ये मिळणार परकीय भाषांचे धडे
सीओईपीने मला जे काही दिले, त्याची परतफेड मी करू शकत नाही. संस्थेच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन ही शिक्षणाची परंपरा पुढे नेण्याची इच्छा आहे. अचलेरकर फाउंडेशनचेही हेच ध्येय आहे. मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही पुढे यशस्वी होऊन आपल्या संस्थेसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे. पल्या देशातील शिक्षण आणखी उच्च पातळीवर जाण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– आशिष अचलेरकर, सीओईपीचे माजी विद्यार्थी

सीओईपीला आतापर्यंत देण्यात आलेल्या देणग्यांपैकी ही सर्वांत मोठी देणगी आहे. या देणगीमुळे आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल. विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक प्रगतीसाठीही निधीचा चांगला वापर होईल, याचा विश्वास वाटतो.
– डॉ. एम. एस. सुतावणे, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

हेही वाचा :  Police Recruitment: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

Medical Education in Marathi: ‘मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे कठीण’
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कमी पटसंख्येच्या शाळा सुरु राहणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …