‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये विश्वसुंदरी Manushi Chhillar ची एन्ट्री

Manushi Chhillar Joins Bade Miyan Chote Miyan : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमात विश्वसुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे. 

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील हा सर्वात मोठा अॅक्शनपट असणार आहे. जानेवारी 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. वाशू आणि जॅकी भननानी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमात मुख्य नायिकेच्या भूमकेत दिसणार आहे. मानुषी छिल्लर याआधीदेखील ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमात खिलाडी कुमारसोबत दिसून आली होती. आता पुन्हा एकदा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षयसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज आहे. 


‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमाच्या शूटिंगला 15 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. तगडी स्टारकास्ट असल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

हेही वाचा :  कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार?

संबंधित बातम्या

Manushi Chhillar : कोण आहे निखिल कामत? ज्याला मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करतेय डेट, जाणून घ्या…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …