Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूने पूर्ण केले  टायगर श्रॉफचे आव्हान 

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही फिटनेस फ्रीक अभिनेत्रा आहे. ती अनेकदा आपल्या फिटनेची झलक दाखवत असते. तिचे वर्कआउट व्हिडीओ अनेकांना प्रेरित करतात.  समंथाने आता पुन्हा एकदा तिच्या त्याच फिटनेस रुटीनची झलक दाखवली आहे.

समंथाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. समंथाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना फिटनेसची आवड निर्माण होत आहे. हा एक चॅलेंज व्हिडीओ आहे, जो समांथाने पूर्ण केला आहे. अलीकडेच टायगर श्रॉफने अॅटॅक चॅलेंजसाठी समंथाला नॉमिनेट केले होते. ते चॅलेंज समंथाने पूर्ण केले आणि अभिनेता अर्जुन कपूरला नॉमिनेट केले. 


समंथाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर कराताना लिहिले आहे की, “मला आव्हान दिल्याबद्दल टायगर श्रॉफचे आभार,  मी करून दाखवले.  यासोबतच तिने अर्जुन कपूरला नॉमिनेट केले आहे.

 रकुल प्रीत सिंहने हे अटॅक चॅलेंज सुरू केले आहे. तिचा ‘अटॅक’ हा चित्रपट 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात जॉन अब्राहमही सुपर सोल्जरच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस देखील आहे.  अटॅक चॅलेंज हा चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग होता. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी उत्साहाने भाग घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेली समंथा सध्या यशोदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होऊ शकतो.  

हेही वाचा :  टांझानियाच्या किली पॉलच्या बहिणीने गायलं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

महत्वाच्या बातम्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …