Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर कोणाला करतेय डेट?

Manushi Chhillar : विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानुषी सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. ती उद्योगपती निखिल कामथला (Nikhil Kamath) डेट करत असल्याची चर्चा आहे. 

मानुषी डेट करत असलेला निखिल कामथ हा भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक आहे. मागील एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मानुषी आणि निखिल दोघांनीही त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. त्यांच्या नात्याची चर्चा रंगू नये, असं त्यांना वाटत असल्याने त्यांनी अद्याप नात्याबद्दल जाहीर केलेलं नाही असं म्हटलं जात आहे. 

मानुषीला सध्या तिच्या करीअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. मानुषीने 2022 साली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमातील मानुषीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला. 


निखिल कामथ याआधी बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरासोबत लग्नबंधनात अडकला होता. 18 एप्रिल 2019 रोजी इलटीत त्यांचे लग्न झाले. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि वर्षभरातच दोघे विभक्त झाले. आता सध्या तो मानुषीला डेट करत आहे. त्यामुळे आता मानुषी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :  एकदम कडक चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज; तानाजी, अरबाज अन् मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. त्यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं. मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. 

संबंधित बातम्या

Tehran : जॉनच्या ‘तेहरान’मध्ये मानुषी छिल्लरची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …