सीडीसीच्या (CDC) मते, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. कारण त्यात भरपूर साखर असते. ज्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकतो. कार्बोनेटेड सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स सहसा आपल्याला हानिकारक वाटत नाहीत. पण सॉफ्ट ड्रिंक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स इतकेच शरीराला नुकसान पोहचवू शकतात. अशा परिस्थितीत, त्याचे गंभीर परिणाम जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. (Cover image credit -Twitter)
डायबिटीजचा धोका
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मते, जे लोक दररोज 1 ते 2 कॅन किंवा त्याहून अधिक सॉफ्ट ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेये घेतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 26% जास्त असतो.
(वाचा :- Long Life Secret: मजबूत व 100 पेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगण्यासाठी करा ही 6 कामे, म्हातारपणीही होणार नाहीत आजार)
किडनी काम करणं बंद करते
जे लोक भरपूर साखर घातलेला किंवा गोड सोडा आणि पॅकेज्ड केलेले ज्यूस पितात त्यांना किडनीचे आजार होण्याची शक्यता असते. यात किडनी स्टोन, किडनी डिसफंक्शन, किडनी फेल यांचाही समावेश होतो.
(वाचा :- भले कितीही भूक लागुदे पण ‘या’ वेळी अजिबात एक घासही खाऊ नका, 25 टक्के वाढेल कॅन्सरचा धोका – स्टडीमध्ये दावा..!)
लठ्ठपणा वाढतो
जे लोक दररोज साखर घातलेला किंवा गोड सोडा किंवा पेये घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आधीच लठ्ठपणाशी झुंजत असाल तर हे तुमच्यासाठी आणखी समस्या निर्माण करू शकते.
(वाचा :- जेनेटिक लठ्ठपणाशी झुंजणा-या डॉक्टरने जिम व डाएट न करता या 1 ट्रिकने घरीच घटवलं तब्बल 35 किलो वजन, बनली प्रेरणा)
हार्ट डिजीजचा धोका
दररोज पिण्याचा सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस घेतल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. नियमितपणे साखरयुक्त पेये घेतल्याने इन्सुलिनच्या प्रतिरोधवर परिणाम होतो, ज्यामुळे सूज वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होतो.
(वाचा :- Prediabetes : डायबिटीज सुरू होण्याआधीच मुळापासून संपवतात किचनमधील या 4 आयुर्वेदिक गोष्टी, वाढतच नाही ब्लड शुगर)
होऊ शकतो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर
फॅटी लिव्हर वाढवणा-या घटकांमध्ये इन्सुलिनचा प्रतिरोध, वाढलेला ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा जास्त वापर यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अल्कोहोल पीत नसाल पण त्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय निवडला तरीही तुम्ही तुमचे लिव्हर धोक्यात आणत आहात.
(वाचा :- Ayurveda Diet Tips: रात्री खात असाल हे 5 पदार्थ तर शरीरात जमा होतील भयंकर विषारी पदार्थ, डॉक्टरांची चेतावणी..!)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने फेल झाले सर्व अवयव..!
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या