दोन मुलींना गाडीत बसवून मुलगा करू लागला स्टंट, पण गाडी डिवायडरवर चढली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे, परंतु हा अपघात चालकाच्या आणि गाडितील लोकांच्या चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे जर या लोकांनी अशी चुक केली नसती. तर हा अपघात टळला असता.

तसे पाहाता दुसऱ्याच्या चुकीमुळे झालेले अपघात टाळता येत नाहीत. परंतु आपण स्वत:जर अलर्ट राहिलो किंवा तशी चुक केली नाही, तर हे अपघात रोखू शकतो हे नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ देखील असाच आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कसा या गाडीतील लोकांच्या चुकीमुळे गाडी डिवायडरला जाऊन ठोकली.

मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार अनियंत्रितपणे डिवायडरवर आदळताना दिसत आहे. खरंतर त्याच्या आत बसलेल्या व्यक्ती दरवाजा उघडून बाहेरच्या दिशेला झुकला, ज्यामुळे गाडीचा तोल गेला आणि टर्निंगच्यावेळी गाडीपूर्णपणे डिवायडरवर चढली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचली.

या गाडीतील लोकांचं नशीब फारच चांगलं होतं की, त्यांना या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

ही कार चंदीगडची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी कारच्या मागील सीटवर दोन मुलीही बसल्या होत्या. यामध्ये सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

या अपघाताचा व्हिडिओ कारमध्ये मागून येणाऱ्या व्यक्तीने बनवला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी चालक आणि स्टंटमनवर कारवाई करत त्यांना अटक केली. यासोबतच तो दारू पिऊन गाडी चालवत होता का, याचाही तपास सुरू आहे.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जगातील अशी जागा जिथे सीट बेल्ट घातल्यास लावला जातो दंड! जाणून घ्या यामागचं कारण

मुंबई : ट्राफीकच्या महत्वाच्या नियमांपैकी एक आहे ते म्हणजे सीट बेल्ट लावणे. तुम्ही जर कार …

मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र ‘वाघा’ने उचलून नेल्याचा आरोप!

बहराइच, उत्तर प्रदेश : Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की …