घसा व नाकात साचलेला कफ मुळापासून होईल साफ व टायफॉईड, करोनाचा धोकाही टळेल, सर्दी-खोकला सुरू होताच करा हे 5 उपाय

थंड वातावरणात व्हायरस आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात, त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा स्थितीत सर्दी-खोकला होणे खूप सामान्य आहे. पण शरीरातील विषारी पदार्थांपासून मुक्त होण्याचा हा शरीराचा स्वत:चा एक मार्ग आहे. या दरम्यान अनेक वेळा संपूर्ण दिनचर्येवर परिणाम होतो. तसेच यामुळे तुम्हाला अशक्त आणि आजारी वाटू शकते. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे असते.

न्यूट्रिशनिस्ट रेणू रखेजा यांनी अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये सर्दी आणि खोकला बरे करण्याचे उपाय शेअर केले आहेत. सर्दी, खोकला, फ्लूच्या या हंगामात हे आजार टाळणे थोडे कठीण आहे असं त्या सांगतात. पण या 5 उपायांनी तुम्ही लगेच यापासून सुटका मिळवू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला ते फक्त सर्दी-खोकल्याच्या सुरुवातीलाच करावे लागतील, कारण हे उपाय सुरुवातीच्या टप्प्यातच खूप प्रभावी ठरतात.

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

थंडीच्या दिवसात बॅक्टेरिया किंवा संसर्गामुळे कफ सहजपणे तयार होतो. अशा परिस्थितीत आराम मिळण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते. कारण ते घशात, छातीत व नाकात साठलेला कफ कमी करते आणि पातळ करून नाकातून बाहेर फेकण्यास मदत करते.

हेही वाचा :  रशिया विरोधात भारत-चीनने नाही केलं मतदान, जाणून घ्या याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होणार परिणाम?

अशाप्रकारे उपाय करा

हा उपाय घरी करून पाहण्यासाठी एका ग्लास पाण्यात १/२ चमचे मीठ विरघळवून घ्या. ते आपल्या तोंडात आणि घशाच्या आसपासच्या भागात फिरवा अर्थात त्या पाण्याने गुळण्या करा आणि मग हे पाणी थुंका. घसादुखीसाठी तुम्ही त्यात तुपाचे काही थेंबही मिसळू शकता.
(वाचा :- Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar)

हळद , मध व काळी मिरीचा काढा

हळद , मध व काळी मिरीचा काढा

हळद, मध व काळी मिरी या तीन गोष्टी अँटी-इन्फ्लमेट्री आणि अँटी-बॅक्टेरियल आहेत. यासोबतच यापासून तयार केलेला काढा हा देखील सर्दी-खोकला बरा करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय आहे.

अशा प्रकारे सेवन करा

फक्त 4 ते 5 काळी मिरी एक चमचा मधात आणि अर्धा चमचा हळदीत रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी काळी मिरी कुटून हळद व मधात घालून त्या काढ्याचे सेवन करा.
(वाचा :- 101 किलोच्या मुलाने Weight Loss साठी लढवली ही शक्कल, सिक्स पॅक्समध्ये बदलली शरीरातील सर्व चरबी, मौल्यवान टिप्स)

आलं आणि ज्येष्ठमध मिश्रण

आलं आणि ज्येष्ठमध मिश्रण

ज्येष्ठमध आणि आले दोन्ही घटक अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहेत. हे पदार्थ दीर्घकाळापासून घसा खवखवणे आणि कफ कमी करण्यासाठी वापरले जातात.

हेही वाचा :  अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण?

अशा प्रकारे करा सेवन

फक्त 1 छोटा चमचा ज्येष्ठमधाची पावडर किंवा 2 ज्येष्ठमधाच्या मुळ्या पाण्यात उकळवा. साधारण 1 किसलेले आले घालून हे मिश्रण तयार करा व कोमट कोमट असतानाच याचे सेवन करा.

(वाचा :- थंडीत सांध्याचा चिकटपणा सुकल्याने होते जीवघेणी गुडघेदुखी, या १५ भाज्या गुडघ्यातील ग्रीस वाढवून वेदना करतात दूर)

7 ते 10 मिनिटांसाठी घ्या वाफ

7-10-

सर्दी-पडसं झाल्यावर अनेकदा नाक बंद होते. अशा परिस्थितीत एक्सपर्ट्स स्टीम किंवा गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देतात. पण बहुतेक लोक पाण्यात विक्स टाकून वाफ घेतात. असे करण्याऐवजी रेणू रखेजा निलगिरीचे इसेंशियल ऑईल पाण्यात मिसळण्याचा सल्ला देतात. ब्रॉन्कायटिस आणि साइनसायटिस यांसारख्या खोकला आणि श्वसन संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी निलगिरीचे तेल फायदेशीर असल्याचे मानले जाते.

(वाचा :- बापरे, नसांमध्ये कॉलेस्ट्रॉल साचल्यास येतो हार्ट अटॅक,नसा व आतड्यातून कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतात हे उपाय)

लसणाचे सेवन करा

लसणाचे सेवन करा

सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत अशा अन्नाचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे, ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. अशावेळी लसणाच्या सेवनाने सर्दीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. त्यात ऍलिसिन हे कंपाऊंड असते, ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे लसूण ठेचल्यावर चांगल्यारितीने बाहेर पडतात.

हेही वाचा :  सुका-ओला खोकला, ताप, सर्दी, घशातील वेदना झटक्यात होतील दूर. करा हे सोपे 8 घरगुती उपाय

अशाप्रकारे करा सेवन

लसणाच्या काही पाकळ्या सूप आणि रस्सामध्ये मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते किंवा फक्त ठेचलेला लसूण थोड्याशा मधामध्ये मिसळा आणि त्याचे सेवन करा.
(वाचा :- Remedies for Cough: घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून कोरडा व ओला खोकला होईल कायमचा छुमंतर, फक्त करा हे 6 उपाय )

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अशी मिळवा सर्दी व खोकल्यापासून मुक्ती..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …