डायबिटीज झाल्यावर व होऊ नये म्हणून सफेद भात खावा की नाही

मधुमेह किंवा डायबिटीज (diabetes) झाल्यास रक्तातील ग्लुकोजचे (blood glucose level) प्रमाण खूप वाढते. ग्लुकोज हा रक्तातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे आणि ही ऊर्जा अन्नामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्समधून मिळते. मधुमेह झाल्यावर निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यात कार्बोहायड्रेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच संतुलित आहार सर्वात महत्वाचा आहे. मधुमेहात भात खावा की नाही? तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे आणि जगातील अर्ध्या लोकसंख्येच्या दैनंदिन आहारात, विशेषत: आशिया भागात भाताला महत्त्वाचे स्थान आहे.

हा भारतीयांचा मुख्य आहार आहे. डायबिटीजच्या रुग्णांना भात खावा की नाही याबाबत नेहमीच शंका असते. शुगरच्या रुग्णांना विशेषतः पांढरा भात खाण्याबद्दल अधिक काळजी वाटते. भात हा मऊ, चवदार, पचायला सोपा आणि भरपूर ऊर्जा देणारा पदार्थ आहे. द्वारका स्थित एचसीएमसीटी मणिपाल हॉस्पिटल्समधील कन्सलटेंट न्यूट्रिशन अँड डाइटेटिक्स डीटी. वैशाली वर्मा सांगत आहेत की, डायबिटीजच्या रुग्णांनी भात खावा की नाही, बरं खावा तर कोणता भात त्यांच्यासाठी योग्य आहे.

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स

डॉक्टरांच्या मते, प्रत्येक 100 ग्रॅम भातात सुमारे 345 कॅलरीज असतात आणि तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यात फायबर, मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण कमी असते. पण यानंतरही भात खाऊ शकतो. मात्र यासाठी त्याचे प्रमाण आणि दर्जा किंवा गुणवत्ता याची काळजी घेणे आवश्यक आहे.

(वाचा :- संधिवात बनू शकतो गुडघेदुखी, किडनी, लिवर व ह्रदयाच्या गंभीर आजारांचे कारण, युरिक अॅसिडवर करा हावर्डचे हे 6 उपाय)

भात खा पण कमी प्रमाणात

जर तुम्ही भात नियंत्रित प्रमाणात खात असाल आणि त्यात भाज्यांचा समावेश केला किंवा तुमच्या आहारात सॅलड किंवा भाज्यांचे सूप समाविष्ट केले तर ते शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. प्रमाण नियंत्रित ठेवण्याव्यतिरिक्त हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की संपूर्ण धान्य संतुलित आहाराचा एक भाग आहे. प्रथिने, हेल्दी फॅट आणि लो-कार्ब्सयुक्त भाज्या यासारख्या इतर पोषक घटकांचा प्रत्येक आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. शेवटी, तुम्ही जेवणात किती भात खात आहात यावर लक्ष ठेवा.

(वाचा :- रिसर्च – दूध नाही या डाळीची साल आहे कॅल्शियमचं भांडार, तुटलेली-कमजोर हाडे, गुडघ्यासाठी आहे वरदान, समजू नका कचरा)

सफेद भात खाताना या गोष्टींची काळजी घ्या

जेव्हा आपण सर्वोत्तम भात कोणता याबद्दल बोलतो तेव्हा सफेद तांदूळ त्यापैकी एक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, तांदळावर पॉलिश किंवा पांढरा लेप लावल्याने त्यातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. पांढऱ्या तांदळाचे बहुतेक फायबर गिरण्यांमध्ये होणाऱ्या बफिंग प्रक्रियेत नष्ट होतात. सर्वात वर असलेल्या कोंड्याच्या लेयरमध्ये बहुतेक पोषक घटक असतात, जे बहुतेकदा मिलिंग प्रक्रियेदरम्यान नष्ट होतात.

(वाचा :- वेटलॉससाठी हा घरगुती उपाय करत असाल तर ठरेल जीवघेणा विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितला फॅट बर्नसाठी योग्य घरगुती उपाय)

ब्राऊन राईस भारी उपाय

ब्राऊन राईस हा संपूर्ण तांदूळ आहे. जर आपण ब्राऊन राईसचे फायदे पाहायला गेलो तर त्यातून फक्त भुसा काढून टाकला जातो, म्हणून त्यात फायबर आणि इतर फायटोकेमिकल्स आणि रिबोफ्लेविन, नियासिन आणि थायामिनसारखे अनेक जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीजसारखी अनेक खनिजे देखील असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स 50 ते 55 दरम्यान असतो, तर पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स 64 ते 70 दरम्यान असतो. त्यामुळे रोजच्या आहारात ब्राऊन राइसचा समावेश करणे कधीही उत्तम.

(वाचा :- Low cholesterol Drink घाण कोलेस्ट्रॉल ह्रदयाला रक्त पुरवणा-या नसा करतं बंद, हे 5 उपाय टाळतील हार्ट अटॅकचा धोका)

असा बनवा भात

ब्राऊन राईस आणि सफेद तांदूळ या दोन्हीमध्ये समान कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांनी मर्यादित प्रमाणात व कमी प्रमाणात भात खावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स ठेवण्यासाठी भात बनवताना काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. भात हळूहळू शिजवा. प्रेशर कुकरऐवजी इतर कोणत्याही भांड्यात भात बनवा आणि त्यात जास्त पाणी घाला. भात खाताना त्यासोबत जास्त फायबरयुक्त पदार्थ खा. भातासोबत डाळी, शेंगा, पालेभाज्या आणि मसाले खा आणि भात मात्र मर्यादित प्रमाणात खा.

(वाचा :- पुरुषहो सावधान, पायात हे 1 गंभीर लक्षण दिसल्यास समजून जा तुम्हाला झालाय प्रोस्टेट कॅन्सर, अजिबात करू नका दुर्लक्ष)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

तुमच्या प्रिय व्यक्तींना मायेने मिठी मारण्याचे आहेत ४ फायदे, जाणून घ्या रंजक माहिती

आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनेपेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? जे शब्दातून व्यक्त करता येत …

संधिवात बनू शकतो गुडघेदुखी, किडनी, लिवर, ह्रदयाच्या गंभीर आजारांचे कारण

युरिक ऍसिड (uric acid) हे रक्तामध्ये आढळणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीर प्युरिन नावाच्या …