Tempered Glass असूनही का खराब होते मोबाइल स्क्रीन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली:Smartphone Screen: स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचू नये आणि संरक्षणाचा अतिरिक्त स्तर देण्यासाठी युजर्स स्क्रीन गार्ड वापरतात. बाजारात अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध आहेत. काही लोक त्यांना टेम्पर्ड ग्लास असेही म्हणतात. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याकडून स्क्रीन गार्ड विकत घेतल्यास ते जवळपास १०० रुपयांमध्ये सुद्धा मिळेल. काहींना तर, तर ५० रुपयांतही मिळू शकतात. स्मार्टफोनच्या मॉडेलनुसार त्याची किंमत अनेक वेळा वाढते. दुसरीकडे, जर तुम्ही ऑनलाइन गेलात, तर तुम्हाला हे स्क्रीन गार्ड १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळतात . स्क्रीन गार्डसाठी इतक्या किमती का असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल.

वाचा: Budget Phones: नवीन फोन खरेदी करायचाय पण बजेट कमी आहे? पाहा स्वस्त स्मार्टफोन्सची ही लिस्ट

स्क्रीन का तुटते ?

तुम्हाला फोनची स्क्रीन स्क्रॅचपासून वाचवायची असेल, तर हे स्वस्त गार्ड हे काम अगदी सहज करू शकतात. परंतु, काही वेळा ते स्क्रीन तुटण्याचे कारणही बनते. डिस्प्लेवर जाड स्क्रीन गार्ड लावल्यानंतर स्क्रीन आणि कव्हरमधील अंतर संपते. यामुळे, तुमचा फोन पडताच, त्याचा परिणाम डिस्प्लेवर पडतो, जो स्क्रीन गार्ड नसेल तर, कमी होऊ शकते.

हेही वाचा :  तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

वाचा: iQOO 11 5G चा सेल सुरू, ५ हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार, ऑफर ‘या’ युजर्ससाठी

टेम्पर्ड ग्लास ऑनलाइन शोधल्यास तुम्हाला १०० रुपयांपासून ते २००० रुपयांपेक्षा अधिक किमतीचे गार्डस उपलब्ध असल्याचे दिसून येईल . महत्वाचे म्हणजे या टेम्पर्ड ग्लासची किंमत बाजाराच्या तुलनेत खूपच कमी आहे.

महागड्या स्क्रीन गार्डमध्ये काय खास आहे?

बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त टेम्पर्ड ग्लास किंवा स्क्रीन प्रोटेक्टर तुमच्या फोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून वाचवू शकतात. पण तुमचा फोन पडला तर हे गार्ड त्यांना सुरक्षित करू शकत नाहीत. स्मार्टफोनची स्क्रीन तुटली नाही तर नशीबच. दुसरीकडे २००० रुपये खर्चून येणारे स्क्रीन प्रोटेक्टर तुमच्या स्क्रीनचे संरक्षण करू शकतात. हे गार्ड तयार करताना उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यांना अशा पद्धतीने बनविण्यात येते की, पडदा पडल्यावर स्क्रिनवर थेट दाब येत नाही. त्याचबरोबर यामध्ये वापरण्यात आलेली काच देखील सामान्यपेक्षा खूपच वेगळी असते आणि हेच त्यांची किंमत किंमत जास्त असण्याचे कारण असते. .

वाचा: ३२ हजार रुपयांचा ‘हा’ पॉप्युलर फोन मिळतोय १० हजारांपेक्षा कमीमध्ये, फीचर्स आहेत बेस्ट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …