वयाच्या 50 शीत ब्रालेट टॉप घालून मलायकाचा लक्ष वेधणारा लुक व्हायरल

तुम्ही कोणीही कितीही काही म्हणा पण बॉलीवूडचा ग्लॅमर दाखवण्यासाठी मलायका अरोरा हे एकच नावच पुरेसे आहे. मलायका ही ती फॅशनिस्टा आहे जिच्या सौंदर्याचे आकर्षण कधीच कमी होत नाही आहे. म्हणजे ती छैया छैया वाली मलायका ते आजची मलायका दोघी सेमच वाटतात. जणू तिच्यात काहीच फरकच पडलेला नाही. आज मलायकाचे वय 49 वर्षे आहे पण ती एवढी स्टायलिस आणि सिझलिंग आहे की आजच्या भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर फिक्या वाटतात.

जिथे मलायका अरोरा असते तिथे अन्य कोणाला लाईमलाईट मिळणे शक्यच नसते. अर्थात तिची स्टाईल आणि तिची फॅशन यांचा जलवाच इतका जबरदस्त आहे की वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून सुद्धा ती अन्य अभिनेत्री आणि मॉडेल्सना तगडी टक्कर देते. नुकताच तिचा एक घायाळ करणारा कातील लुक समोर आला आहे आणि हा तिचा जबरदस्त आणि भन्नाट लुक सगळ्यांना वेड लावणारा ठरला आहे. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @malaikaaroraofficial, @manekaharisinghani, Navbhart Times)

मोनोक्रोम लुकचा जलवा

मलायका अरोराची फॅशन स्टायलिस्ट मनेका हरीसिंघानीने तिचे काही मोनोक्रोम आउटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ब्लॅक अँड व्हाइट कपड्यांमध्ये ती खूपच कातील दिसत आहे. मलायकाने परिधान केलेला ब्लॅक अँड व्हाईट टॉप एका लेयर्ड पॅटर्नमध्ये होता आणि त्यात व्हाईट स्ट्रिंग दिली गेली होती.

हेही वाचा :  बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा

(वाचा :- शाहरूखच्या लेकामुळे पाकिस्तानी मॉडेल चर्चेत, साडीपासून मिडी ड्रेसपर्यंत सर्वच लुकमध्ये जणू नुरजहॉंचीच प्रतिमा)

मिनीमल एफर्ट्सनी लुक केला कम्प्लीट

मलायकाने या टॉपसोबत ब्लॅक लेगिंग्स घातली होती, ज्यावर व्हाइट पाइपिंग डिटेल्स दिसत होते. त्याचवेळी, तिने या लुकसाठी डार्क कलरचा ब्लेझर घातला होता आणि पायात पॉइंटेड बुट्स घातले होते. मलायका या कपड्यांमध्ये किलर पोझ देताना दिसली. तिच्या या फोटोंवरून नजर काही केल्या हटत नव्हती. या लुकसाठी मलायकाने ज्वेलरी स्किप केली होती आणि डार्क रेड लीप शेड्स, शिमरी आयशॅडो आणि कॉन्टोर चीक्ससोबत केसांना मोकळे सोडले होते.

(वाचा :- तब्बल 57 करोडच्या आसपास कमाई असणा-या श्रद्धा कपूरचा हा आगळावेगळा अवतार पाहून व्हाल थक्कच, साधेपणाने जिंकली मनं)

आऊटिंगसाठी परफेक्ट आहे हा लुक

याआधीही मलायकाचे अनेक लूक व्हायरल झाले आहेत, त्यापैकी हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. फोटोमध्ये ती सोफ्यावर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. तिने या लूकला ओव्हरसाईज शर्ट, ब्रालेट टॉप आणि डिस्ट्रेस्ड शॉर्ट्ससह कम्प्लीट केले आहे. फॅशन डिझायनर Alexander Wang यांच्या न्यू कलेक्शनमधून मलायकाने हे शॉर्टस पिक केले होते. हाय हिल्स बुट्स आणि गोल्ड स्टेटमेंट रिंग्सने तिने तिचा लूक परिपूर्ण बनवला होता. लाईट मेकअपमुळे मलायका अजून जास्त आकर्षक वाटत होती.

हेही वाचा :  “मी मलायकावर आजही जीवापाड प्रेम करतो, पण मला या गोष्टीची भीती आहे की..” अरबाज खानचं हे वक्तव्य वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

(वाचा :- अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण? यलो साडी व शिमरी वनपीसमध्ये जान्हवी व मलायकालाही देतीये टक्कर)

मलायकाचा मॉर्डन लुक

मलायकाचा हा लूक तर तुम्हाला अजून वेड लावू शकतो. फोटोत तिने लक्झरी ब्रँड Versace चे निळ्या रंगाचे ब्रालेट घातलेले दिसत आहे, ज्यासोबत तिने मॅचिंग ब्लेझर आणि फ्लेर्ड पॅंट घातली होती. मलायकाने पावडर ब्लू सनग्लासेस आणि शॉर्ट हेअरस्टाइलने तिचा दिलखेचक लूक पूर्ण केला.

(वाचा :- बिपाशा बासूच्या ग्लॅमरचा जलवा कायम, मालदीवच्या बीचवरील सिझलिंग फोटोज इंटरनेटवर व्हायरल, एक एक लुक करतोय घायाळ)

मलायकाचा ट्रेडीशनल लुक

मलायकाचे स्टायलिश लुक पाहिलेत आता मलायकाचा सुंदर ट्रेडीशनलं लुक पहा. बॉम्बे टाईम्स या फॅशन शो मधील मलायका अरोराचा हा देसी लुक सर्वांनाच अचंबित करणारा ठरला. जशी तिने रॅम्पवर एन्ट्री घेतली तशी तिने सर्व शोची लाईमलाईटच हिरावून घेतली. उपस्थित प्रत्येक नजर केवळ तिच्यावरच खिळली होती. मलायकाने हा यलो कलरचा लेहंगा-चोळी सेट फॅशन डिजाइनर गोपी वैद्यच्या कलेक्शनमधून पिक केला होता. खरंतर मलायका या डिजाईनरसाठी म्युज बनली होती आणि रॅम्पवर आपल्या ग्लॅमरस लुकने सर्वांना वेड लावत होती.

हेही वाचा :  Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

(वाचा :- दिवसेंदिवस मलायका होत आहे अधिकच तरूण, शॉर्ट पॅंटमध्ये सोफ्यावर बसून दिल्या अशा कातील पोझ की..!)

जबरदस्त लुकने केलं चाहत्यांना वेडं

मलायकाने जो लेहंगा परिधान केला होता तो डिजाईनरच्या Qila कलेक्शनमधून होता. ज्यामध्ये डीप नेकलाईन व बॅकलेस ब्लाऊज पूर्णपणे लुकचा ग्लॅमर वाढवण्याचे काम करत होती. यलो कलरच्या क्रॉप चोळीमध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाइन दिली गेली होती. ज्यामध्ये तिचे क्लीवेज पोर्शन पूर्णपणे स्पष्ट दिसत होते. शिवाय या लो-कट मुळे तिचा लुक खूपच जास्त आकर्षक वाटत होता. चोळीमध्ये जियोमेट्रिकल मोटिफ्सची एंब्रॉइडरी सुद्धा दिसून येत होती.

(वाचा :- आर्यन खानला डेट करत असल्याच्या गाजावाजामध्ये नोरा फतेहीचं रापचिक फोटोशूट व्हायरल, धोती स्कर्ट घेतोय लक्ष वेधून)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …