VIDEO : संतापजनक! रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बेडवर पडून आणि दोन डॉक्टरांचं जोरदार भांडण

Fact Check : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो त्यांचं हे कृत्य पाहून प्रत्येक जण घाबरला आहे. तुम्हाला अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor)  कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपट आठवतो. त्यात डॉक्टर असणारा शाहिद कपूर दारुच्या नशेत रुग्णाचं ऑपरेशन करतो. किंवा तुम्हाला  ‘मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील (Munna Bhai MBBS) तो सीन आठवतो का, ज्यात डॉ. अस्थाना (Dr. Astana) म्हणजे बोमन इराणी ऑपरेश करत असतो आणि मुन्ना भाई म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt ) अचानक ऑपरेशन थिएटरमध्ये येतो. या अशाप्रसंगी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णाच्या मनात काय सुरु असेल त्याचा जीवाचं काय याची कल्पनाही करणं कठीण आहे. खरं तर ऑपरेशन थिएटरमध्ये (Operation theater video) रुग्णासोबत असणारे डॉक्टर आणि काही सहकारी डॉक्टर नर्स काय करतात, तिथे काय काय होतं हे कायम चार भिंतीतच राहते. अनेक रुग्णांना बेशुद्ध केल्यामुळे त्यांनाही कल्पना नसते की, त्यांचासोबत काय होतं ते.  

रुग्णाचा जीवाशी खेळ!

सोशल मीडियावर (Social media) अचानक एकाने व्हिडीओ (Viral Video ) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संतापजनक असा हा व्हिडीओमध्ये दोन डॉक्टर एकमेकांना शिवीगाळ (Doctor fight vidoe) करताना दिसतं आहेत. कुठला आहे हा व्हिडीओ आणि काय आहे या व्हिडीओमागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑपरेशन थिएटरमधील ओटी बेडवर एक रुग्ण आहे. त्याला सलाईन लावलेली दिसतं आहे.  अशातच दोन डॉक्टर एकमेकांशी वाद घालताना दिसतं आहे. ऑपरेशन थिएटरमधील इतर डॉक्टर, नर्स त्यांना रुग्णाचा विचार करा आणि भांडण थांबवा. ते दोन डॉक्टर सगळं विसरुन फक्त एकमेकांना शिवागाळ करण्यात व्यस्त होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ ओटीमधील कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. (Trending Video Patient lying on operation theater bed and two doctors hassle verbal abuse Viral on Social media marathi news)

हेही वाचा :  Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

पाकिस्तानचा व्हिडीओ? 

या व्हिडीओमागील सत्य तपासले असता, असं समजलं की हा व्हिडीओ जुना आहे.  हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तारिक फतहने @HasnaZarooriHai या अकाउंटवर हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचं म्हटलं आहे. 

असा पण दावा!

तर हा व्हिडीओ चंदीगडमधील असल्याचा दावा पत्रकार ममता त्रिपाठी यांनी केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन आणि रिसर्च चंडीगढमधील आहे. 

व्हिडीओचं सत्य (Fact check) 

सर्च केल्यानंतर या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. हा व्हिडीओ 31 ऑगस्ट 2017 मधील असून जोधपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती.

स्त्री रोग तज्ज्ञ अशोक नैनवाल ऑपरेशन करताना एनेस्थेटिस्ट मथुरा लाल टाक यांच्यासोबत वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार या वादानंतर रुग्ण महिलेने तिचं नवजात बाळ गमावलं होतं. त्यानंतर हे प्रकरण राजस्थान हायकोर्ट पोहोचलं होतं. 

हेही वाचा :  "रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता, मग मंत्र्यांना...", पवारांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …