‘त्या’ शाळांविरोधात गुन्हे दाखल करा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातील शाळांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना त्यापाठोपाठ आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पितळ उघडे पडले आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी इंग्रजी माध्यमांच्या किती शाळा सुरू आहेत, याची माहिती शाळांनी शिक्षण विभागांना देणे अपेक्षित आहे. मात्र, त्याची माहिती बहुतांश शाळांनी जिल्हा परिषदेला दिली नसल्याचे उघड झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळा तपासणीचे आदेश दिले. त्यातून राज्य सरकारची मान्यता नसतानाही त्या शाळा अद्याप सुरू ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील १३ शाळा अनधिकृत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या शाळांनी वर्ग सुरू केले असून, त्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत. त्या शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :  गोदामातील परीक्षा रडारवर; कॉलेजची मान्यता रद्दची प्रक्रिया सुरू

त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत कार्यवाही सुरू केली जाईल. या १३ शाळा हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक; तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या ठिकाणच्या आहेत. दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा यात समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

यापूर्वी गट शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस देऊन तपासणी केली होती. त्या वेळी गेल्या वर्षी जिल्ह्यातील ४३ शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेने कारवाई केली होती. त्यापैकी २९ शाळा बंद होत्या, तर १४ शाळा सुरू होत्या. त्यापैकी चार शाळांनी प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे लोणीकाळभोर, दौंड, हवेली तालुक्यातील चार शाळांनी दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली.
School Closed: कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

Education System: ‘उच्च जातींनाच उच्च शिक्षण हीच व्यवस्था’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …