Ashram Schools Vacancy: आश्रमशाळेतील ४१ टक्के पदे रिक्त

मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. सरकारच्या तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांच्या मृत्यूसाठी हे महत्त्वाचे कारण असले तरीही जे कर्मचारी सध्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहे ते त्याच आश्रमशाळांसाठी काम करतात का, याची तातडीने छाननी होण्याची गरज आहे. राजकीय दबावामध्ये असलेल्या आश्रमशाळांमध्ये नियुक्त असलेले असंख्य कर्मचारी हे राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले जातात. ज्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक मिळत नाहीत, अशी सातत्याने ओरड केली जाते तिथे अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत
आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ४९७ शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून या सर्व आश्रमशाळांमध्ये १६ हजार ४४३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार ५५३ (५९%) पदे भरली गेली असून ६ हजार ६९० (४१%) पदे रिक्त आहेत. शिक्षक व मुख्याध्यापकांची ७ हजार ३३८ पदे मंजूर असून त्यापैकी ४ हजार ६०७ पदे भरली आहेत. तर दोन हजार ७३१ पदे रिक्त आहेत.

हेही वाचा :  HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १ हजार ७०८ पदे मंजूर असून त्यापैकी १ हजार १९२ पदे भरली आहेत, तर ५१६ पदे रिक्त आहेत. राज्यात ५४० अनुदानित आश्रमशाळांमध्ये २ लाख ४२ हजार ७१६ विद्यार्थी असून त्यामध्ये १५ हजार ७१३ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ हजार पदे भरली असून ९५४ पदे रिक्त आहेत.

AIIMS मध्ये नोकरीची उत्तम संधी! पदभरतीचा तपशील जाणून घ्या
शिक्षक मुख्याध्यापकांची पदे भरली असून वर्ग चारमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांची ७.२३ टक्के पदे मंजूर आहेत. आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांचे मृत्यू या संवेदनशील व गंभीर विषयावर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे मृत्यू होऊ नयेत, आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी, येथील रिक्त पदे भरली जावीत याबाबत सरकारची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या सातत्याने संपर्क केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. गंभीर समस्येकडे डोळेझाक आश्रमशाळांमधील रिक्तपदांचा मुद्दा मांडला की जीव गमावलेल्या आदिवासी बालकांच्या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली जाते, असा अनुभव बालहक्क कार्यकर्ते मांडतात. ‘या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुमार आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण व समग्र विकास करणाऱ्या वातावरणापासून या शाळा दुर्गम भागांमध्ये आहेत. ज्याठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी आश्रमशाळांची उपलब्धता आहे का, यासाठी या शाळांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची गरज आहे’, असे समर्थन व श्रमजीवी संस्थेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व आश्रमशाळांचे किमान दोन वर्षांतून एकदा मूल्यमापन करण्यात यावे, त्यांच्या दर्जाप्रमाणे या आश्रमशाळांना शेरे देण्यात यावेत.

हेही वाचा :  RTE Admission 2022: आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ

त्यामुळे आश्रमशाळांचा दर्जा सुधारेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये आजच्या घडीला ६ हजार ६९० पदे रिक्त आहे. राज्य मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणीमध्ये सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये पदभरतीची प्रक्रिया सुरू करू असे सांगितले होते. अद्याप मात्र त्यास मुहूर्त मिळालेला नाही.

राज्यभरातील पालिकांमध्ये होणार भरती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …