नोकरीच्या ठिकाणी या’ गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा करिअरवर होईल परिणाम

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Dec 2022, 10:00 am

Career Tips: कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये वावरताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतीही चूक त्याची छबी खराब करू शकते. ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपण करणे चुकीचे असते. याचा परिणाम आपल्या नोकरीवर आणि पर्यायाने आपल्या करिअरवर होऊ शकतो. ऑफिसमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि ज्याची नेहमी काळजी घेतली पाहिजे याची माहिती करुन घ्या.

 

Office Work Tips
नोकरीच्या ठिकाणी या’ गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा करिअरवर होईल परिणाम

हायलाइट्स:

  • नोकरीच्या ठिकाणी या’ गोष्टी चुकूनही करु नका
  • अन्यथा करिअरवर होईल परिणाम
  • महत्वाच्या टिप्स करा फॉलो
हेही वाचा :  एका शिक्षिकेच्या खांद्यावर १०५ विद्यार्थ्यांची जबाबदारी
Career Tips: आजकाल प्रत्येक व्यक्ती यशस्वी करिअर करण्याच्या मागे असतो. ज्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे खूप अवघड आहे. पण त्याहीपेक्षा ती नोकरी टिकवणे हे अवघड आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये वावरताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतीही चूक त्याची छबी खराब करू शकते. ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपण करणे चुकीचे असते. याचा परिणाम आपल्या नोकरीवर आणि पर्यायाने आपल्या करिअरवर होऊ शकतो. ऑफिसमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि ज्याची नेहमी काळजी घेतली पाहिजे याची माहिती करुन घ्या.


ऑफिसमध्ये वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नका. तुमचे वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवन नेहमी वेगळे ठेवा. तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्याने काही वेळा ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल अफवा पसरू शकतात. तसेच सहकाऱ्यांसमोर तुमची छापही चुकीची होऊ शकते. त्यामुळे कामावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वक्तशीर नसणे

कर्मचार्‍याला कार्यालयातील कोणतेही काम, प्रोजेक्ट किंवा लक्ष्य दिलेल्या मुदतीपर्यंत पूर्ण करावे लागते. नेहमी कार्यालयात वेळेवर पोहोचणे देखील तुम्हाला प्रोफेशनल बनवते. जर कर्मचारी वक्तशीर नसेल तर त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावरही खूप वाईट परिणाम होतो. तसेच जर तुम्ही ऑफिसला वेळेपूर्वी पोहोचलात तर लोक तुमची प्रशंसा करतात.

हेही वाचा :  पश्चिम विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४२५ जगाची बंपर भरती; 'असा' करा अर्ज

‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची?’, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे ‘असे’ द्या प्रभावी उत्तर
Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या

सहकाऱ्याशी चांगले न वागणे पडेल महागात

ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बढाई मारली किंवा कोणाशीही गैरवर्तन केले तर त्यामुळे तुमची प्रतिमा अत्यंत नकारात्मक होईल. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबतचे संबंध अजिबात खराब करू नका. मग तो तुमचा कनिष्ठ असो वा वरिष्ठ. त्यांना चांगली वागणूक आणि आदर द्या.

कार्यालयात फोनचा अतिवापर

ऑफिसमध्ये तुमचा फोन स्वतःपासून थोडा दूर ठेवा. तुमचा फोन पुन्हा पुन्हा वापरत असताना तुम्ही कोणाच्या नजरेत आलात तर तुमची छाप खूप चुकीची ठरु शकते. यासोबतच तुम्हाला खूप अनप्रोफेशनल देखील म्हटले जाईल.

Career Tips: अनुभव नसला तरी सहज मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या ५ टिप्स

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  परदेशात शिक्षण घ्यायचंय? काळजी कसली करता, एकलव्य आहे ना...!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …