गणिताची आवड असेल तर बारावीनंतर करिअरचे ५ पर्याय, इतरांपेक्षा अधिक कमाईची संधी

Career After HSC : आपण दररोज करत असलेल्या जवळपास प्रत्येक कामात गणिताचा काही प्रमाणात सहभाग असतो. बहुतांश व्यवसायात बेरीज आणि वजाबाकी वापर होतो. तर अनेक ठिकाणी किचकट बीजगणित आणि आकडेवारीचा समावेश असतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी या क्षेत्रात करिअरसाठी गणिताची कौशल्ये येणे महत्त्वाची आहेत. विशेषतः हॉटेल मॅनेजमेंट, मास मीडिया, अॅनिमेशन, रिटेल, लॉजिस्टिक्स इ. सारख्या काही प्रोफाइलमध्ये गणिताची पदवी नसली तरीही मूलभूत गणिताची माहिती असणे आवश्यक आहे.

जे विद्यार्थी बारावीमध्ये गणिताचा अभ्यास करत आहेत आणि आगामी नवीन ट्रेंडिंग करिअरमध्ये त्यांचे भविष्य घडवू इच्छितात, त्यांच्याकडे इंजिनीअरिंगसहित इतर अनेक करिअर पर्याय आहेत. असे विद्यार्थी कोणत्या विषयांसह गणिताचा अभ्यास करू शकतात आणि नोकरीचे पर्याय काय असतील याविषयी करिअर काऊन्सलर नीना जेम्स यांनी माहिती दिली आहे.

१) एक्च्युरियल सायन्स (Acturial Science)

कॉम्बिनेशन: गणितासह अर्थशास्त्र / स्टॅटिस्टिक्स
एक्च्युरियल सायन्स शिकणारे विद्यार्थ्यी इंश्योरन्स रिस्क, इंश्योरन्स प्रिमियम आणि इंश्योरन्स कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट संबंधीचे काम करता येईल. या सर्व क्षेत्रांमध्ये एक्च्युरियल सायन्स शिकणारे विद्यार्थी काम करू शकतात. ते किचकट समस्यांचे निराकरण करण्यात मदत करतात आणि कंपनी धोरणे विकसित करण्यात मदत करतात.

हेही वाचा :  CBSE टर्म १ चा निकाल कधी होणार जाहीर?... पाहा मोठी अपडेट

२) कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स (Computational Mathematics)

कॉम्बिनेशन: गणितासह कॉम्प्युटर सायन्स
कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिकल कॉम्प्युटर सायन्स आणि मॅथ्स यांचे मिश्रण आहे. हे कॉम्बिनेशन विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, विश्लेषणात्मक आणि प्रोग्रामिंग कौशल्ये वाढविते. मॅथ्स संबंधित सर्वच फिल्डमध्ये तरुणांनी काम करावे यासाठी ही कौशल्ये असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, व्यवसाय, वैद्यकीय संशोधन, कॅन्सर मॉडेलिंग, हवामान अंदाज आणि फायनान्शिअल मॉडेलिंग यासारख्या क्षेत्रात ही कौशल्य कामी येतील.

३) फायनांशियल एनालिस्ट (Financial Analyst)

कॉम्बिनेशन: मॅथ्ससोबत फायनान्स
यामध्ये करिअर करताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर, शेअर बाजार विश्लेषक, जोखीम विश्लेषक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक, संख्याशास्त्रज्ञ, विमा पॉलिसी विकसक इत्यादी म्हणून काम करू शकता.

Engineering Admissions: इंजिनीअरिंग प्रवेशांमध्ये २१ हजारांनी वाढ

४) मनोचिकित्सक / मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist / Psychiatrist)

कॉम्बिनेशन: गणितासह मानसशास्त्र
निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मानसशास्त्रात अनेक प्रयोग आहेत. रुग्णाशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी आणि त्यावर सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आता हे काम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कमी वेळात केले जाते ज्यामध्ये गणित आणि संगणकीय मॉडेल्सच्या सहाय्याने मानवी वर्तन समजले जाते.

५) बिझनेस ॲनालिस्ट (Business Analyst)

कॉम्बिनेशन: मॅथ्ससह बिझनेस मॅनेजमेंट
आजच्या ऑनलाइन आणि स्पर्धेच्या युगात, व्यवसायातील वाढीसाठी भविष्यातील शक्यता शोधणे हे व्यवसाय विश्लेषणाचे काम आहे. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवसाय विश्लेषक विश्लेषण करतात. आजकाल प्रत्येक व्यवसायाला बिझनेस अॅनालिस्टची गरज असते.

हेही वाचा :  शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

ONGC Recruitment: पदवीधर उमेदवारांना ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …