CBSE टर्म १ चा निकाल कधी होणार जाहीर?… पाहा मोठी अपडेट

CBSE Results 2021: सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी टर्म १ परीक्षेच्या निकालाची (CBSE Term १ Result) आतुरतेने वाट पाहत आहेत. या निकालाच्या तारखेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. सीबीएसई बोर्ड २०२२ (CBSE Board Exam) च्या परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण २०२० (New Education Policy 2020, NEP 2020) अंतर्गत घेतल्या जात आहेत. त्यामुळे बोर्डाने परीक्षांचे २ टर्ममध्ये विभाजन करण्यात आले आहे. सीबीएसई टर्म १ ची परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती. सीबीएसई टर्म २ ची परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये घेतली जाणार आहे.

सीबीएसई टर्म १ चा निकाल फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर केला जाणार होता. पण आजही म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत निकाला (CBSE Result 2021) वर कोणतेही अपडेट मिळालेले नाही.

सीबीएसई टर्म २ परीक्षा सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पण टर्म १ निकाल जाहीर करण्याच्या तारखेबद्दल अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आले नाही. अशावेळी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत वाढ होताना दिसत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
मार्चमध्ये निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाकडून आतापर्यंत निकालाचे अपडेट न मिळाल्यास मार्चमध्ये निकाल जाहीर होऊ शकतो, असे मानले जात आहे. सीबीएसईची प्रॅक्टीकल परीक्षा देखील २ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे बोर्डाकडून सीबीएसई टर्म १ आणि टर्म २ चा निकाल (CBSE Result)एकाच वेळी जाहीर केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपडेट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

२६ एप्रिलपासून परीक्षा

२०२१-२२ या वर्षासाठी सीबीएसईच्या दुसऱ्या टप्प्याची बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होण्याची तारीख बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. दरम्यान सीबीएसईने याचे वेळापत्रक जाहीर केले नाही. हे वेळापत्रक मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  NPCIL Job: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

देशभरातील विद्यार्थी आणि पालक टर्म २ च्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात विद्यार्थी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिक्षणमंत्री, सीबीएसई आणि इतरांना विनंती करत आहेत. शिकवणी वर्ग ऑनलाइन घेण्यात आले होते आणि करोना प्रादुर्भाव संपला नसताना परीक्षा ऑफलाइन का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. त्यामुळे सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
MPSC अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांची भरती, जाणून घ्या तपशील
डिजीलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी…
स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून ‘DigiLocker APP’ डाउनलोड करा.
स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, ‘सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

हेही वाचा :  CBSE बारावी टर्म १ गुणांवर असमाधानी विद्यार्थ्यांनी 'येथे' नोंदवा आक्षेप

CBSE दहावी, बारावीचा निकाल उमंग अॅपवर तपासण्यासाठी..
स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी ‘CBSE’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा.
स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …