CISF जवानाने २५ फूट उंचीवर अडकलेल्या चिमुरडीचे धाडसाने वाचवले प्राण! बचावकार्याचा Video Viral


ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे.

रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर एक मुलगी ग्रीलमध्ये अडकली , तिला नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या जवानांनी वाचवले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्माण विहार मेट्रो स्थानकावर एक मुलगी खेळत असताना जमिनीपासून सुमारे २५ फूट उंचीवर असलेल्या रेल्वेच्या ग्रीलजवळ पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर तिला तिची चूक लक्षात आल्यावर ती रडू लागली. तिने परतण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.

तिच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले, त्यानंतर उपस्थित लोकांनी सीआयएसएफच्या जवानांना याची माहिती दिली. यानंतर, सीआयएसएफचे जवान त्या पातळ रेलिंगवरून सावधपणे चालत मुलीजवळ आले.

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

https://www.youtube.com/watch?v=3HYjquCqAgg

सीआयएसएफ जवानाने सावधपणे मुलीला पकडून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर मुलगी आईजवळ पोहोचल्यानंतर शांत झाली आणि तिची आई खूश झाली.

(हे ही वाचा: Russia Ukraine War: अमेरिका कॅनडातील वाइन शॉप्सनी व्होडकावर काढला राग; ओतून रिकाम्या केल्या बाटल्या)

हेही वाचा :  'डेट भेट' मध्ये सोनाली, संतोष अन् हेमंतची प्रमुख भूमिका;

ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे. मुलीचा आवाज ऐकून लोकांनी मुलीची सुटका केली. यानंतर सर्वजण जवानाच्या शौर्याचे कौतुक करताना दिसले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …