खासगी विद्यापीठांवर नियंत्रण ठेवा, विद्यार्थी-पालकांकडून होतेय मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ही विद्यापीठे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (एफआरए) अंतर्गत तातडीने आणावीत, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून जोर धरू लागली आहे. सरकारने कोणाच्याही दबावाला बळी न पडता, येत्या शैक्षणिक वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचीही मागणी केली आहे.

राज्यात खासगी विद्यापीठांची संख्या वाढत असून, शुल्कावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे राज्य सरकारने शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी विधेयक तयार केले आहे. त्याला मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर, विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात अनेक शैक्षणिक संस्था, त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयांचे ‘क्लस्टरिंग’ करून खासगी विद्यापीठे निर्माण करतील. पुढील वर्षभरात विद्यापीठांची संख्या ४०च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यापीठांत राज्यातील विद्यार्थ्यांना शिकण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशा वेळी या विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याची भावना अभ्यासकांनी व्यक्त केली.

खासगी विद्यापीठांचे शुल्क नियंत्रणात येण्याची आवश्यकता आहे. आर्थिक परिस्थितीनुसार पालकांचे वेगवेगळे स्तर आहेत. त्याच्या आधारावर ही नवी शैक्षणिक दरी होणे टाळायचे असेल, तर हुशार आणि गरजू विद्यार्थ्याला परवडणारे शुल्क हवे. शिक्षण एकमेव समग्र उन्नतीचे साधन असल्याने, त्या संधीची न्यायपूर्ण उपलब्धता सर्वांना असायला हवी. नव्याने येणारी परदेशी विद्यापीठे नफेखोरी करणारी नसावीत. त्यांच्या बाबतीतही शिक्षण ‘कमोडिटी’ म्हणजे वस्तू ठरवून ‘ज्याला परवडेल त्यालाच शिक्षण’ हे धोरण अनेकांच्या शिक्षण हक्कावर गदा आणू शकते, असे ‘आप पालक युनियन’चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

हेही वाचा :  'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान

मराठवाडा विद्यापीठाचा निर्धार; प्रवेश, निकाल वेळेत लागण्यासाठी काम सुरू

‘दादा, बिझी आहेत… तुम्हाला कॉल करतील’

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होईल, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांपासून सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र, ‘दादा कोल्हापुरात कार्यक्रमात आहेत’, ‘दादा लोकांशी संवाद साधत आहेत’, ‘दादा ‘जी-२०’च्या बैठकीत आहेत’, ‘तुम्हाला कॉल करतील’… अशी उत्तरे पीए आणि खास व्यक्तींकडून देण्यात आली. मात्र, याबाबत कोणतीही माहिती दादा किंवा त्यांच्या कार्यालयाने दिली नाही. त्यामुळे प्रस्तावित विधेयकाला मंजुरी मिळून, निर्णय लागू होतो, की कार्यवाही थंडबस्त्यात जाते, याकडे लक्ष लागले आहे.

अवाजवी शुल्कामुळे स्थानिक प्रवेशापासून वंचित

‘खासगी आणि अभिमत विद्यापीठांवर सरकारचे नियंत्रण नाही. या विद्यापीठांवर सरकारी अंकुश कडक करण्याची आवश्यकता आहे. केवळ शुल्कच नव्हे, तर ही विद्यापीठे स्वतःची प्रवेश प्रक्रिया राबवून त्यामार्फत प्रवेश देण्याचे काम करतात. ही प्रवेश प्रक्रिया संशयास्पद आहे. अवाजवी शुल्क आकारणीमुळे अनेक स्थानिक गुणवंत विद्यार्थी हक्काच्या स्थानिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हा स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. याबाबत सरकारने कडक कारवाई करून विद्यापीठांचा कारभार सुधारण्याची गरज आहे,’ असे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा :  RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी

सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यापीठांचे शुल्क निम्म्याने होणार कमी
School Closed: कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …