Gender Equality in Kerala: शाळांमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांना सर आणि मॅडम या शब्दांनी संबोधित करतात. पण विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सर, मॅडम असे संबोधण्याचे दिवस संपतील असे वाटण्याची शक्यता आहे. आता मुलांना शिक्षकांशी बोलताना फक्त शिक्षक (Teacher) हा शब्द वापरावा लागणार आहे. केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने ने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.
केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (Kerala State Commission for Protection of Child Rights, KSCPCR) दिलेल्या निर्देशानुसार, केरळमधील शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘सर’ किंवा ‘मॅडम’ ऐवजी ‘शिक्षक’ म्हणून संबोधावे. केरळ बाल हक्क पॅनेलच्या माहितीनुसार, ‘शिक्षक’ हा शब्द ‘सर’ किंवा ‘मॅडम’ सारख्या संबोधनांपेक्षा तटस्थ शब्द आहे. केएससीपीसीआरच्या आदेशात ‘सर’ आणि ‘मॅडम’ अशा शब्दांतून संबोधणे टाळण्याचाही उल्लेख आहे.
केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (KSCPCR) पॅनेलचे अध्यक्ष केव्ही मनोज कुमार आणि सदस्य सी विजयकुमार यांच्या खंडपीठाने सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘शिक्षक’ हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले.
सर किंवा मॅडम ऐवजी ‘शिक्षक’ म्हणणे सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानता टिकवून ठेवण्यास मदत करेल आणि शिक्षकांबद्दलची त्यांची ओढ देखील वाढेल असे राज्य बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ असे संबोधून भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर विचार करून अशाप्रकारचे निर्देश देण्यात आले होते.