Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का…

Indigo Flight Video : सोशल मीडियावर (Social media) रोज प्रत्येक क्षणा क्षणाला कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतं असतो.  विमानातील अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. काही व्हिडिओ हे फार मजेदार असतात. तर काही व्हिडिओ धक्कादायक (Shocking Video) असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) एका प्रवाश्यावर चिडलेली दिसतं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं ते…

काय घडलं नेमकं?

एक मिनिटाचा या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासीमध्ये वादावादी सुरु आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रवासी म्हणतोय की, तुम्ही माझ्यावर का ओरडत आहेत? त्यावर ती एअर होस्टेस म्हणाली की, तुम्ही आमच्यावर ओरडत आहात. या चिडलेल्या एअर होस्टेसला इतर सहकारी शांत करताना दिसतं आहे. पण ती त्या प्रवाशांवर चांगलीच भडकली होती. (Trending video Indigo Flight air hostess passenger fight You will be shocked to hear the reason)

काय कारण होतं?

ही एअर होस्टेस म्हणताना दिसतं आहे की, तुम्ही माझ्या क्रूशा असं बोलू शकतं नाही. तुम्ही आमच्या क्रूचा आदर केला पाहिजे. प्रवाशाने एअर होस्टेसला विचारले की, तिने तिच्या क्रूचा अपमान कसा केला? यावर एअर होस्टेस म्हणाली की, तिच्या क्रूकला तुम्ही बोट दाखवत. हे ऐकून प्रवाशाने एअर होस्टेसला ‘शट अप’ म्हणाला. यानंतर एअर होस्टेसही प्रवाशाला ‘यू शट अप’ असं म्हटलं…हा सगळ्या प्रकार विमानातील दुसऱ्या प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. 

हेही वाचा :  "मोदी सरकारमुळे महिलांची उंची वाढली"; जाहीर सभेत भाजपा नेत्याचं अजब विधान

व्हिडिओ व्हायरल

फ्लाइटमध्ये देण्यात आलेल्या जेवणावरून हा वाद सुरु झाल्याचं काही जण म्हणतं आहेत. त्यात भर पडली ती प्रवाशाने एअर होस्टेसला नोकर म्हटल्याने प्रकरण अजून चिघळलं. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस म्हणताना दिसतं आहे की, ”मी एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही.”

इंडिगोची प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडिओ  इस्तंबूलहून दिल्लीला (Delhi Viral Video) येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये (Indigo Fight Video) घडला आहे. विमानातील प्रवाशांचे वर्तन योग्य नसल्यामुळे ती एअर होस्टेस टीम लीडर असल्याने तिला या प्रकरणात बोलावं लागलं. त्या प्रवाश्याने एअर होस्टेसचा अपमान केला आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचंही इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून …

‘दोन मुलांमधील मैत्री…,’ नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधान

LokSabha Election: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश …