PAK vs NZ : विल्यमसनचं द्विशतक, किवी संघानं उभारला 612 धावांचा डोंगर, कसोटी रंगतदार स्थितीत

PAK vs NZ 4th Day : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला आज चार दिवस पूर्ण झाले आहेत. चौथ्या दिवशीच्या अखेरीस सामना रोमांचक वळणावर आला आहे. दिवसअखेर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 2 बाद 77 धावा केल्या आहेत. ज्यामुळे न्यूझीलंड अजूनही 97 धावांनी पुढे आहे. विशेष म्हणजे आज न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) द्विशतक पूर्ण केलं. त्याने 21 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 200 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर न्यूझीलंडने 9 गडी गमावून 612 धावा करून पहिला डाव घोषित केला आणि विरोधी संघ पाकिस्तानला खेळण्याचे आमंत्रण दिले. ज्यामुळे केन विल्यमसन आणि एजाज पटेल नाबाद परतले.

पाकिस्तान कमजोर स्थितीत

चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने दोन महत्त्वाचे विकेट गमावले. यामध्ये सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय शान मसूदने 10 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी इमाम-उल-हक 45 धावा करून नाबाद माघारी परतला आणि नौमान अलीने 4 धावा केल्या आहेत. संघाला आता शेवटच्या दिवसापूर्वी 97 धावांची आघाडी घेऊन न्यूझीलंडला लक्ष्य द्यायचे आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात मायकल ब्रेसवेल आणि ईश सोधीने 1-1 बळी घेतला.

हेही वाचा :  IPL 2022 : कर्णधार ऋषभ पंतला मोठा धक्का, स्टार प्लेअर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार

बाबरनंही केली गोलंदाजी

live reels News Reels

युवा फिरकी गोलंदाज अबरार अहमद पुन्हा एकदा उत्कृष्ट लयीत दिसला. पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेतल्या. याशिवाय नौमान अलीने 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी वसीम ज्युनियरलाही एक विकेट घेण्यात यश आलं. याशिवाय मीर हमजाही विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्याचवेळी कर्णधार बाबर आझमनेही चार षटकं टाकली, ज्यात त्याने 11 धावा दिल्या आणि एक मेडन ओव्हरही टाकली.


हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …