Dussehra 2023 : भारतातील ‘या’ शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा

Dasara 2023 : यंदा 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या दिवशी रावणाच्या पुतळ्याला वाईटाचे प्रतीक मानून दहन केले जाते. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावण दहन केले जात नाही. या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही तर रावणाच्या मृत्यूचा शोक केला जातो. या ठिकाणी रावणाचा दुखवटा पाळला जातो. जाणून घ्या कोणती ती ठिकाणे आणि तिथे रावण दहन का होत नाही.

दसऱ्याला विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस असेही म्हणतात. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला होता, असे मानले जाते. त्यामुळे दुष्टाईच्या पराभवाचे प्रतीक म्हणून दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. परंतु भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही. यामागे सर्वत्र वेगवेगळी कारणे आहेत. चला जाणून घेऊया, ती कोणती ठिकाणे आहेत आणि त्यामागील कारणे काय आहेत.

गडचिरोली, महाराष्ट्र

या ठिकाणी गोंड जमातीचे लोक राहतात, जे स्वतःला रावणाचे वंशज मानतात. ते रावणाची पूजा करतात आणि त्यांच्या मते तुलसीदासांनी लिहिलेल्या रामायणातच रावणाला वाईट दाखवले आहे, जे चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहनही केले जात नाही.

हेही वाचा :  Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

मंदसौर, मध्य प्रदेश

असे मानले जाते की, मंदसौर हे रावणाची पत्नी मंदोदरीचे जन्मस्थान आहे. त्यामुळे येथील रहिवासी रावणाला आपला जावई मानतात आणि त्यांच्या सुनेचा मृत्यू झाला तरी साजरी केली जात नाही. त्यामुळे येथे रावण दहन केले जात नाही. तर दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मृत्यूचा शोक केला जातो. येथे रावणाचा ३५ फूट उंच पुतळाही आहे.

बिसरख, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील या गावात रावणाचा जन्म झाल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे येथील लोक रावणाला आपला पूर्वज मानतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात. रावणाचे वडील ऋषी विश्रव आणि आई कैकेसी राक्षसी होते. असेही मानले जाते की. रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यांच्या सन्मानार्थ या स्थानाचे नाव त्यांच्या नावावर बिसरख ठेवण्यात आले आणि येथील रहिवासी रावणाला महा ब्राह्मण मानतात.

कांगडा, उत्तराखंड

कांगडा येथे लंकापतीने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून वरदान मिळवले होते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथील लोक रावणाला महादेवाचा सर्वात मोठा भक्त मानतात आणि त्याचा आदर करतात. त्यामुळे येथे रावण दहन केले जात नाही.

हेही वाचा :  आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

मंडोरे, राजस्थान

हे ठिकाण मंदोदरीच्या वडिलांची राजधानी होती असे येथील लोक मानतात आणि याच ठिकाणी रावणाने मंदोदरीचा विवाह केला होता. त्यामुळे येथील लोक रावणाला आपला जावई मानतात आणि त्याचा आदर करतात. त्यामुळे विजयादशमीला येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …