Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण… जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

Vasu Baras 2023 : गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार ‘अश्विन’ हा सण साजरा होतो. 

 गायी आणि वासरांची पूजा : 

हा सण समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा भक्त गोवत्स द्वादशीच्या दिवशी ‘सात्विक’ कामं करतात किंवा उपवास करतात आणि या दिवशी ध्रुव नक्षत्राची प्रार्थना करतात तर त्यांच्या पापांपासून मुक्ती होते. या दिवशी गायीची पूजा करणाऱ्या भक्तांना शांती, आनंद आणि निरोगी आयुष्य लाभते. आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, विविध हिंदू देवता आणि देवी विविध प्राण्यांच्या रूपात अवतरले आहेत. म्हणूनच आपण सर्व प्राण्यांमध्ये गाईला सर्वात पवित्र मानतो. वसुबारसला कामधेनूला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते. या दिवशी गाईंचे पूजन केल्यानंतर गाईला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या नेवेद्यामागेही एक विशेष कारण आहे. 

हेही वाचा :  फरहान अख्तरशी का केलं लग्न? शिबानी दांडेकरनं सांगितलं खरं कारण

 विशेष नैवेद्य : 

वसुबारस या दिवशी एक विशेष नैवेद्य बनवला जातो, जो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. या नैवेद्यामध्ये गाईला भाजी-भाकरी आणि गोडाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचा असतो. या नैवेद्यामध्ये भाजी-भाकरी आणि गोडाचे पदार्थ असतात. यामध्ये गवारीची भाजी, भाकरी आणि गुळाचा समावेश असतो. या पदार्थांमागेही एक कारण आहे. 

दिवाळीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो आणि या ऋतूमध्ये  आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण अनेक पदार्थांचे सेवन करायचे असते. 

गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. ते हिमोग्लोबिन पातळी चांगली ठेवण्यासाठी मद्दत करते आणि बाजरीची भाकरी देखील असंच काम करते. ही भाकरी शरीरात उष्णता रोखते. तर गवारीची भाजी खाण्यामागचे असे कारण आहे की त्यात प्रोटीन,फायबर, व्हिटामिन, फॉसफरस, कॅल्शिअम, आयर्न असे अनेक घटक असतात, यामुळेही भाजी हिवाळ्यात शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. आणि म्हणूनच आपणयाचे नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून खातो.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …