विभागीय रुग्णालयांमध्ये २४ तास रुग्णसेवा


पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएमएच) येणारा प्रचंड ताण कमी करण्याच्या हेतूने एकेक करत उभारण्यात आलेली विभागीय रुग्णालये आता पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज आहेत. चव्हाण रुग्णालयाप्रमाणेच भोसरी, पिंपरी, आकुर्डी आणि थेरगाव येथे बांधण्यात आलेल्या प्रशस्त विभागीय रुग्णालयांमध्ये लवकरच २४ तास रुग्णसेवा देण्यात येणार आहे.

जवळपास साडेसातशे खाटांसह उपचारांच्या सर्व सोयीसुविधा असणारे चव्हाण रुग्णालय जेव्हा बांधून पूर्ण झाले, तेव्हा पांढरा हत्ती म्हणून त्या इमारतीला हिणवण्यात येत होते. मात्र कालांतराने शहरवासीयांसाठी चव्हाण रुग्णालय वरदान ठरले. चव्हाण रुग्णालयात बऱ्याच आधीपासून २४ तास रुग्णसेवा दिली जाते. पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या विविध भागातून नागरिक उपचारासाठी चव्हाण रुग्णालयात येतात. त्याचा परिणाम म्हणून चव्हाण रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण असतो. अलीकडे तो ताण कमालीचा वाढू लागला होता. एवढय़ा मोठय़ा रुग्णालयातही रुग्णांना जागा अपुरी पडत असल्याचे चित्र वारंवार दिसू लागले. तेव्हा पालिकेने शहराच्या वेगवेगळय़ा भागात विभागीय रुग्णालये उभारून त्या ठिकाणी सक्षम रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, चिंचवडला सावित्रीबाई फुले रुग्णालय, पिंपरीतील नवे जिजामाता रुग्णालय, भोसरीतील नवीन रुग्णालय, आकुर्डीतील कुटे रुग्णालय आणि थेरगाव रुग्णालय ही बांधून पूर्ण करण्यात आली. जवळपास २५० ते ३०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विभागीय रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. करोनाकाळात या रुग्णालयांचा मोठय़ा प्रमाणात शहरवासीयांसाठी उपयोग झाला. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी ही विभागीय रुग्णालये २४ तास सुरू ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले होते. मनुष्यबळ आणि उपकरणांची कमतरता अशा काही अडचणी वगळता २४ तास रुग्णसेवा सुरू करणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार, कार्यवाही सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसांत ही रुग्णालये २४ तास रुग्णसेवा देऊ शकतील, असा विश्वास या विभागाकडून व्यक्त केला आहे.

हेही वाचा :  पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

विभागीय रुग्णालये आणि वैद्यकीय अधिकारी

’ चव्हाण रुग्णालय – डॉ. शंकर जाधव

’ आकुर्डी रुग्णालय

– डॉ. बाळासाहेब होडगर

’ नवीन भोसरी रुग्णालय

– डॉ. शिवाजी ढगे

’ थेरगाव रुग्णालय – डॉ. अभय दादेवार

’ नवीन जिजामाता रुग्णालय

– डॉ. सुनीता साळवी

’ तालेरा रुग्णालय

– डॉ. संगीता तिरूमणी

The post विभागीय रुग्णालयांमध्ये २४ तास रुग्णसेवा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …