उजनी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव बारगळला


सहा हेक्टर जागेच्या बदल्यात जलसंपदा विभागाकडून ४० कोटी रुपयांची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र तो बारगळला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) धरणालगतची सहा हेक्टर जागा जलसंपदा विभागाकडे मागितली होती. मात्र, या जागेच्या बदल्यात जलसंपदा विभागाने तब्बल ४० कोटी रुपयांची मागणी एमटीडीसीकडे केली आहे. मात्र, करोनामुळे एवढा निधी कसा उभा करायचा हा प्रश्न असल्याने उजनी येथील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव बारगळला आहे.

उजनीच्या परिसरात कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा आहे. धरणाचे काम पूर्ण होऊन ४० वर्षांचा कालावधी झाला आहे. मूळ आराखडय़ात धरणाच्या पायथ्यास उजव्या तीरावर ४३.२६ हेक्टर जमीन पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान व म्हैसूर येथील वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवरही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमण केलेल्या स्थानिकांकडून या प्रकल्पाला विरोध आहे. तसेच निधीच्या अनुपलब्धतेमुळे अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘एमटीडीसी’ने अतिक्रमण न झालेली सहा हेक्टर जागा जलसंपदा विभागाकडे मागितली होती. यावर तंबू निवास, बोटिंग, पक्षी निरीक्षण आदी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाने सहा हेक्टर जागेच्या बदल्यात ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. करोनामुळे एवढा निधी महामंडळाकडे उपलब्ध नाही आणि तो मिळण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत पुढे काहीही झाले नाही, अशी माहिती एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

हेही वाचा :  हिजाबच्या निमित्ताने मालेगावात राजकीय चढाओढ

उजनी परिसरात पर्यटकांची गर्दी

स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या उजनी धरणावर दरवर्षी युरोपासह विविध देशांमधून पक्षी येतात. तसेच हिवाळय़ात रशिया जवळच्या युरेशिया, सायबेरिया, मंगोलिया येथून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी व अन्य स्थलांतरित पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होत असतात. पुढे तीन-चार महिने विविध राज्यांतील जलस्थानांवर वास्तव्य करून परत आपल्या मूळ प्रदेशाकडे हे पक्षी निघून जातात. त्यामुळे पक्षी निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक, तसेच उन्हाळय़ात प्रकल्पातील पाणी कमी झाल्यामुळे उघडय़ावर पडणारे पळसनाथ मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन केंद्र एमटीडीसीने प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटकांची सोय होणार असून महामंडळाला मोठय़ा प्रमाणात निधीही मिळणार आहे.

The post उजनी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव बारगळला appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …