Breaking News
  • …अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात
  • Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, “माझा पराभव झाला तेव्हा…”
  • कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?
  • मुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का
  • विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरोपींची आरती काढत होतात का?; योगी आदित्यनाथ SP वर संतापले

डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत केंद्राने उत्तर द्यावे


उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मागणी

पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती झाली याचा आनंदच आहे. मात्र पुणे विद्यापीठात असताना डॉ. पंडित यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्यावरील कारवाई चुकीची होती का, त्याबाबत केंद्र सरकारच्या व्हिजिलन्स समितीने काय केले, याबाबत माहिती नाही. पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करणार कोण, असा प्रश्न उपस्थित करत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पंडित यांची नियुक्ती कशी झाली याचे उत्तर केंद्राने देशाला दिले पाहिजे, अशी मागणी केली. 

 दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शांतिश्री धुलपुडी पंडित यांची नियुक्ती झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. २००२ ते २००७ या कालावधीत भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) या राखीव जागांवरील प्रवेश गैरप्रकाराबाबत डॉ. पंडित यांच्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेली पाच वेतनवाढी रोखण्याची कारवाई, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्याकडे केलेले दुर्लक्ष असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेल्या सामंत यांना डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत, डॉ. पंडित यांनी घेतलेल्या बाराशे दिवसांच्या रजेबाबत प्रश्न विचारण्यात आले.

हेही वाचा :  मंदीवाल्यांची पकड अधिक घट्ट

डॉ. पंडित यांना बाराशे दिवसांची रजा कशी देण्यात आली. याबाबत चौकशी करण्यात येईल.  केंद्राच्या व्हिजिलन्स समितीने विद्यापीठाच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले असल्यास विद्यापीठाने डॉ. पंडित यांच्यावर केलेली कारवाई चुकीची होती का, ती कारवाई चुकीची असल्यास त्या प्रकरणाची चौकशी आणि केलेल्या कारवाईचे काय करायचे, असे प्रश्न निर्माण होतात. डॉ. पंडित यांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्राला पत्र लिहिणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

The post डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत केंद्राने उत्तर द्यावे appeared first on Loksatta.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …