सतत नखं चावताय? हा घ्या रामबाण उपाय या 4 प्रकारे सवय कायमची दूर करा

लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना ताण आल्यानंतर नखं चावण्याची सवय असते. पण या वाईटसवयीचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. आपल्या हातावर असणारे जंतू थेट तोंडात जावू शकतात. यागोष्टीमुळे पोटाचे आजार होई शकतात. त्याचप्रमाणे सतत नखं चावल्याने हातांची शोभा देखील निघून जाते. अशात चारचौघांमध्ये अशी नखं दाखवताना अपमानास्पद वाटू शकते. जर तुम्हाला या वाईट सवयीपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही या काही टिप्स फॉलो करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : istock)

कारण समजून घ्या

कारण समजून घ्या

नखं चावण्याची अनेक कारणे असू शकतात. तुमच्या या सवयीमागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर जर एखादा व्यक्ती मानसिकरीत्या एखाद्या अडचणीमधून किंवा त्रासामधून जात असेल तर अशा व्यक्तींना नखं चावण्याची जास्त सवय असते.

तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की जेव्हा माणूस स्ट्रेसमधून जात असतो. तेव्हा अशा व्यक्ती त्यांची नखं चावतात. या गोष्टीवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

(वाचा :- Hair Wash during Pregnancy : प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर )

नखे लहान ठेवा

नखे लहान ठेवा

आपले नखे लहान ठेवा आणि त्यांना नियमितपणे ट्रिम करा. नखे लहान ठेवल्याने तुम्हाला नखं चावण्यापासून रोखता येईल, कारण या स्थितीत नखे चावल्याने दुखापत होण्याचा धोका वाढतो. नखांच्या बाजूच्या त्वचा निघाल्यानंतर खूप त्रास होतो.

(वाचा :- 69 वर्षी रेखाच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, सौंदर्य व फिटनेसचे हे आहे रहस्य)

नेल पॉलिश लावा

नेल पॉलिश लावा

जर तु्म्हाला ही सवय मोडायची असेल तर तुमच्या नखांवर नेलपॉलिश लावा. यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. प्रथम:
नखांना पाहून तुमची नजर तोंडाकडे जाणार नाही. दुसरे म्हणजे नेलपॉलिशची चव कडू असते, त्यामुळे तुम्ही चावणे टाळाल.

(वाचा :- काहीही खाताना – पिताना लिपस्टिक निघून जाते मग फॉलो करा या सिंपल टिप्स)​

नेल एक्सटेंशन

नेल एक्सटेंशन

नेल एक्सटेंशनसाठी विविध प्रकारची सामग्री वापरली जाते त्यामुळे नखे चावू शकत नाही. ही पद्धत थोडी महाग आहे. पण यामुळे तुमची नखं खाण्याची सवय निघून जाईल.

(वाचा :- Cleaning Tips: मिक्सरच्या भांड्याचे डाग काढण्यासाठी ट्राय करा हे उपाय, काही मिनिटांत दिसेल नवे )

हेही वाचा :  Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

या पद्धती देखील करतील मदत

या पद्धती देखील करतील मदत
  • काही लोकांना एकाच बोटाची नखे चावण्याची सवय असते. अशा परिस्थितीत त्यावर बँडडेड लावता येते.
  • तोंडात बबल गम ठेवा आणि ते चावत रहा त्यामुळे तुम्हाला नखं खाण्याची सोडण्यास मदत होईल.
  • तुम्ही योग्यवेळी मॅनिक्युअर करुन देखील या सवयीवर मात करु शकता.
  • नखे चावणे मानसिक किंवा भावनिक परिस्थितीमुळे आहे, तर तज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.

(वाचा :- या 4 सोप्या पद्धतींमुळे रक्त आतून होईल स्वच्छ, काचेसारखी चमकू लागेल त्वचा तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …