KL Rahul Athiya Shetty:तुझ्यामुळे प्रेमाचा खरा अर्थ कळाला म्हणत के एल राहुलची पडली विकेट, पाहा लग्नाचे Unseen Photo

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी Suniel Shetty याची मुलगी Athiya Shetty हिचा विवाह क्रिकेट फलंदाज के एल राहुल याच्या सोबत खंडाळा येथे पार पडला. विवाह सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही मोजक्याच मित्रमंडळींना निमंत्रित केलं होतं. अथिया आणि राहुल यांचा विवाहसोहळा तीन दिवस सुरू होता.
अथिया आणि राहुल यांच्या लग्न सोहळ्याला अनुपम खेर,इशांत शर्मा, अंशुला कपूर, कृष्णा श्रॉफ हे सहभागी झाले होते. समोर आलेल्या महितीनुसार लग्नाला आलेल्या पाहुण्यांचा दाक्षिणात्य पद्धतीनं पाहुणचार करण्यात आला. अथिया आणि राहुल यांचं लग्न झाल्यानंतर काही विधी आटोपल्यानंतर क्रिकेटर के. एल. राहुलने त्याचे प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लग्नाच्या सुवर्ण क्षणांचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :- @योगेन शाह, @klrahul, @athiyashetty)

असा होता अथियाचा लुक

असा होता अथियाचा लुक

या सुवर्ण दिवशी अथियाने पेस्टल रंगच्या लेहेंग्याची निवड केली. हा लेहेंगा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केला होता. या लेहेंग्यामध्ये नववधू अथिया शेट्टी खूपच सुंदर दिसत होती. यावेळी अथियाच्या लेहेंग्याला फुल स्लिव्ज देण्यात आले होते. तर तीच्या संपूर्ण लेहेंग्यावर फुलांची बरीक नक्षी काढण्यात आली होती. या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात ती अगदी परी प्रमाणे भासत होती.
(वाचा :- या डिझायनरचा लेहेंगा परिधान करून ईशा अंबानीने केली वहिनीसोबत तगडी स्पर्धा, या खास गोष्टीने होतेय तुफान चर्चा )

हेही वाचा :  OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून 'गायब' झालेला 'तो' कोण?

असा होता मेकअप

असा होता मेकअप

या खास दिवशी अथियाने मेकअप सुद्धा खूप खास ठेवला होता. यावेळी तिने नॅचरल मेकअप केला होता. तर गालांवर गुलाबी ब्लश लावून तिने तिचा लूक पूर्ण केला. या पेस्टल लेहंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. नववधूचे तेज तिच्या चेहऱ्यावर सहजपणे दिसत होते.
(वाचा :- मलायका अरोराने परिधान केला निळ्या रंगाचा हाय-स्लिट गाऊन, चाहते म्हणतात मुन्नीला पाहून कुछ कुछ होता हैं ! )

हिऱ्या- मोत्यांच्या दागिन्यांनी वाढवली शान

हिऱ्या- मोत्यांच्या दागिन्यांनी वाढवली शान

या खास क्षणाला अथियाने हिऱ्या आणि मोत्यांची निवड केली. यावेळी तिने गळ्यामध्ये एकच मोठा हार परिधान केला आहे. तर कानामध्ये मोठे कानातले घातलेआहेत. त्याचप्रमाणे यावेळी मांगटिका लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. अथिया या फोटोंमध्ये एखाद्या राजकन्येप्रमाणे भासत आहे.
(वाचा :- कोणी मढलं हिऱ्याने, तर कोणी सोन्याने, अंबानींच्या सुनांचा शाही थाट, तुम्हालाही आवरणार नाही दागिन्यांचा मोह)

असा होता KL Rahulचा लुक

-kl-rahul-

यावेळी KL Rahulने देखील पेस्टल रंगाची शेरवानी परिधान केली होती. यावेळी त्याने गळ्यामध्ये ग्रीन रंगाची मोत्यांची माळा परिधान करुन त्याचा लुक पूर्ण केला. या फोटोमध्ये के राहुल अगदी राजकुमारासारखा भासत आहे. दोघांच्याही गळ्यात सफेद फुलांची वरमाला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :  गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याला कोणते खेळाडू मुकणार?, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

(वाचा :- अनंत अंबानींच्या एंगेजमेंटमध्ये ऐश्वर्या रायच्या मुलीने केले सर्वांना थक्क,चाहते म्हणाले ही तर आईची दुसरी कॉपी )

KL Rahul ने व्यक्त केले प्रेम

kl-rahul-

क्रिकेटर के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी विवाह बंधनात अडकले आहेत. क्रिकेटर के. एल. राहुलने त्याचे प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नातील काही फोटो शेअर करत अथिया प्रती प्रेम व्यक्त केले आहे. तिने लिहिले, ”तुझ्या प्रकाशात, मी प्रेम कसे करावे हे शिकत आहे” आज, आमच्या प्रियजनांसोबत, आम्ही विवाह बंधनात अडकलो. आम्हाला खूप आनंद होत आहे.”

(वाचा :- केसात गजरा, आणि नखशिखंत हिऱ्याने सजलेल्या नीता अंबानीच्या लुकपुढे नवी सून राधिकाही फिकी )

नवीन आयुष्याची सुरुवात

अण्णाचा असा होता लुक

अण्णाचा असा होता लुक

यावेळी बॉलिवूडचा हँडसम हंक सुनिल शेट्टी यांनी पारंपारिक साऊथ इंडियन लुक केला होता. यावेळी त्यांने पेस्टल रंगाची लुंगी आणि त्यावर पठाणी शर्ट परिधान केले होते. हा लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी गळ्यात सोन्याचा माळा देखील परिधान केल्या होत्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …