Crime News: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या

Virar Crime News : पश्चिम रेल्वे मार्गावरील (western railway) विरार (Virar) हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. विरार रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात अत्यंत धक्कायक घटना घडली आहे. एका प्रवाशाने धावत्या लोकलखाली येवून आत्महत्या केली आहे. यामुळे सर्व ट्रेन खोळंबल्या होत्या. 

विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास चर्चगेट हून विरार रेल्वे स्थानकात पोहोचणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पोहोचत होती. यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचता असतानाच एका तरुणाने ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची  माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  ट्रेनखाली सापडलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र रेल्वे पोलीसांनी हमालांच्या मदतीने ट्रेनखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत झाली.

हेही वाचा :  आई-वडिलांच्या सडलेल्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं बाळ, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर...; पोलीसही हळहळले

आत्महत्या करणारा तरुण कोण आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.  या तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेची शूटिंगमधून विक्रमी कमाई 

पश्चिम रेल्वेनं शूटिंगमधून विक्रमी कमाई केली आहे. शूटिंगमधून रेल्वेला 1 कोटी 64 हजार उत्पन्न मिळाले आहे. पश्चिम रेल्वेवर विविध ठिकाणी 20 हून अधिक चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. यामध्ये चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही कमर्शियल तसेच जाहिरातीचा समावेश आहे.

आरपीएफ जवानांनी वर्षभरात 33 प्रवाशांचे जीव वाचवला

सोलापूर विभागात आरपीएफ जवानांनी वर्षभरात 33 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. मिशन जीवन रक्षक अंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर या 5 रेल्वे स्थानकांवर सुरक्षारक्षकांनी गेल्या एका वर्षात 86 लोकांना जीवदान दिले आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …