Video Viral : बडे भाईsss! राहुल गांधी यांना हाक मारत त्यांच्याविषयी काय म्हणाल्या प्रियंका ?

Rahul Gandhi Priyanka Gandhi : सप्टेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या काँग्रेसच्या (Bharat jodo yatra) ‘भारत जोडो यात्रे’मध्ये बरेच पैलू पाहायला मिळाले. राज्यांच्या सीमा ओलांडता ओलांडता या यात्रेमध्ये त्या त्या राज्याची, प्रांताची झलकही पाहायला मिळाली. (Kanyakumari) कन्याकुमारीपासून म्हणजेच देशाच्या (South india) दक्षिणेकडील टोकापासून सुरु झालेला हा प्रवास आता उत्तरेच्या दिशेनं सरसावत आहे. सध्या ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असून, साधारण 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा पुन्हा सुरु झाली. गाझियाबादमध्ये (Gaziabad) या यात्रेचं स्वागत खुद्द राहुल गांधी यांच्या बहिणीनं केलं. यावेळी नेमकं काय घडलं याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (congress bharat jodo yatra Rahul gandhi shares best bond with sister Priyanka Gandhi )

भावाला पाहून प्रियंका यांचा आनंद गगनात मावेना 

गाझियाबादमध्ये प्रियंका गांधी यांनी या यात्रेचं स्वागत केलं आणि भावाला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. सोशल मीडियावर यावेळचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले. जिथं ही बहीण- भावाची जोडी एकमेकांसोबत गप्पा मारताना एकमेकांची खोडही काढताना दिसत आहे. एक मोठा भाऊ ज्याप्रमाणं लहान बहिणीची काळजी घेतो, तिचे लाड करतो अगदी तसंच राहुल गांधीसुद्धा करताना दिसले. यावेळी ते राजकीय नेत्याहून जास्त एक भाऊ म्हणूनच सर्वांसमक्ष आले. (Rahul Gandhi Priyanka Gandhi Viral Video)

हेही वाचा :  'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'

माझा भाऊ एक योद्धा आहे… 

यावेळी प्रियंका यांनी राहुल गांधी यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी मनोगतही व्यक्त केलं. ‘ओ मेरे बडे भाई…. इधर देखो’ असं त्या राहुल गांधी यांचं लक्ष वेधत म्हणाल्या. भावाला हाक मारत आपल्याला सर्वाधिक अभिमान त्याचाच वाटतो या शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. 

‘यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावला, सत्तेच्या चाव्या फिरल्या, सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले पण ते (राहुल गांधी) मात्र मागे फिरले नाहीत. त्याच्यामागे अनेक यंत्रणा लावत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते घाबरले नाहीत… योद्धा आहे माझा भाऊ’, असं त्या म्हणाल्या. 

एका योद्ध्याप्रमाणं पुढे जाणाऱ्या माझ्या भावानं एक प्रेमाचं दुकान सुरु केलंय आणि हे दुकान प्रत्येक गल्लीबोळात, देशाच्या कानाकोपऱ्यात असायला हवं नाहीतर, घृणेचं राजकारण पुढे जाईल आणि नागरिकांचं कधीच समाधान होणार नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अदानी आणि अंबानी यांनी (Adani and Ambani) यांनी सर्वकाही विकत घेतलं पण, ते माझ्या भावाला मात्र विकत घेऊ शकले नाहीत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते शक्य नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

हेही वाचा :  Congress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …