Crime News: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime News : लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना घडली आहे. लोकलच्या लगेज डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. रेल्वे पोलिस (railway police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे (Mumbai Crime News). 

धावत्या लोकलच्या लगेज डब्यात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. या वृद्धाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता  लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नेमकं घडलयं तरी काय?

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये या वृद्धाची हत्या झाल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. हत्या झालेल्या वृद्धाचे नाव बबन देशमुख असे आहे.  या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात देखील घेतल आहे.

हेही वाचा :  मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

बबन देशमुख हे आंबिवली येथे राहणारे आहेत. आंबिवली येथून लोकल पकडून ते काही कामानिमित्त कल्याणलाआले होते. काम आटपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यासाठी त्यांनी कल्याण रेल्वे स्थाकनातून टिटवाळाकडे जाणारी लोकल पकडली. 

देशमुख लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. मात्र, लोकलमध्ये चढतांना किंवा बसण्याच्या कारणावरून इथे वाद होऊन त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला. देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिका रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झालीय हे पोलीस तपासानंतर समोर येईल.

लोकलमध्ये आढळला होता वापरलेला कंडोम

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अंबरनाथ लोकलमध्ये वापरलेला कंडोम आढळून आला होता. एका प्रवाशाने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर देखील प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …