अथिय आणि केएल राहुलच्या लग्नाच्या तारखेच्या अफवांवर सुनिल शेट्टीनं दिली प्रतिक्रिया

Suniel Shetty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही क्रिकेटपटू केएल राहुलला (KL Rahul) डेट करत आहे. दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा शाही विवाहसोहळा 21 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सुनील शेट्टीनं ‘धारावी बॅंक’ या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला होता की,”अथिया आणि केएलचं लग्न लवकरच होईल”. आता सुनिलनं अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या तारखेबाबत पसरणाऱ्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सुनिल शेट्टी? 

एका मुलाखतीमध्ये सुनिलला अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या तारखेबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुनीलनं उत्तर दिलं,  “जेव्हा तुम्हाला निश्चित तारखा मिळतील, तेव्हा मला कळवा जेणेकरून मी (लग्नाला) उपस्थित राहू शकेन,” सुनिलच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

काही दिवसांपूर्वी काही  मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की क्रिकेटर केएल राहुलनं जानेवारी 2023 मध्ये रजेसाठी अर्ज केला होता आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला मान्यता दिली होती. त्यामुळे या दरम्यान केएल राहुल आणि अथिया यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. 

हेही वाचा :  …आणि 200 कोटींचा टप्पा पार! ‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास!

News Reels


अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म ‘हिरो’ मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …