अशी सुरु झाली केएल राहुल आणि अथिया शेट्टीची फिल्मी लव्हस्टोरी,सुनील शेट्टीनेही बजावली महत्त्वाची भूमिका

क्रिकेट आणि बॉलिवूड ही समीकरण खूपच जुने आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. शर्मिला टागोर-मंसूर अली खान, विराट-अनुष्का, युझवेंद्र-धनाश्री, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझहर यांच्यानंतर आणखी एक क्रिकेट आणि बॉलीवूडची जोडी चर्चेत आहे ती म्हणजे अथिया शेट्टी आणि केएल राहुल. या दोघांनी ही त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर केली आहे. अशात आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत. पण तुम्हाला यांची सुंदर लव्हस्टोरी माहित आहे का ? अथिया आणि केएल राहुल यांच्या लव्हस्टोरीत अण्णा सुनिल शेट्टीनेही खूप महत्त्वाची भुमिका बजावली आहे. चला तर मग जाणून घेऊयात यांची लव्हस्टेरी. (फोटो सौजन्य : @athiyashetty @klrahul)

​कशी होती अथिया आणि केएल राहुलची पहिली भेट?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता केएल राहुल आणि अथियाची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडच्यामध्यमातून झाली होती. मात्र त्यांच्या पहिल्या भेटीबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही. अथिया आणि राहुलच्या फोटोंना पाहून त्याचा चाहतांना खूप आनंद होतो हे मात्र नक्की. (वाचा :- राहुल द्रविडला चिअरअप करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत पोहचली विजेता,स्वप्नाहून सुंदर प्रेम कहाणी )

हेही वाचा :  Old Pension Scheme : संप बेकायदेशीर, सरकारची कोर्टात माहिती; संप याचिकेवरील सुनावणी 23 मार्चपर्यंत तहकूब

​अथियाने दिला राहुलला दिला आनंदाचा धक्का

2021 मध्ये, जेव्हा केएल राहुल इंग्लंड कसोटी मालिका खेळण्यासाठी निघाला तेव्हा अथिया देखील त्याच्यासोबत गेली होती. तेथे जावून अथियाने राहुलला आनंदाचा धक्काच दिला होता. त्यावेळी या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले होते. (वाचा :- पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न, ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली)

सुनील शेट्टींनी केली मोठी मदत

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना सुरुवातीला त्यांचे नाते मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवायचे होते. यात अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही मदत केली. सुनील शेट्टीने लव्हबर्ड्सना त्यांचे नाते लाइमलाइटपासून दूर ठेवण्यास मदत केली. जेव्हा जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि राहुलबद्दल प्रश्न विचारला जायचा तेव्हा तो ‘फक्त मीडिया रिपोर्ट्स’ म्हणून फेटाळायचा. (वाचा :- लालभडक ड्रेस आणि हातात वरमाला घेऊन राखी सावंत झाली खान घराण्याची सून, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल )

​नात्यात एकमेकांना समजून घ्या

कोणत्याही नात्यात एकमेकांना समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. एकमेकांना समजून कोणत्याही परिस्थितीत एकमेकांसाठी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला नाते टिकवायचे असेल तर एकमेकांना समजून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु?)

हेही वाचा :  Suniel Shetty : अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेवर सुनील शेट्टीनं सोडलं मौन

​एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करा

प्रत्येक माणूस वेगळा असतो त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या वेगळेपणाचा आदर करा. तुमचा जोडीदार जसा आहे त्याला तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करा. (वाचा :- पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न, ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली )Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …