पठाणला मिळणारा रिस्पॉन्स पाहण्यासाठी दीपिका पोहोचली मुंबईच्या थिएटरमध्ये, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा पठाण (Pathan) चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. थिएटरमधील पठाण चित्रपटाच्या शो दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण, बेशरम रंग या गाण्यावर थिएटमध्ये थिरकताना दिसत आहेत. थिएटरमध्ये पठाणला मिळणारा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी नुकतीच दीपिका मुंबईमधील (Mumbai)  एका थिएटरमध्ये गेली. यावेळी दीपिकानं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 

मुंबईमधील आयकॉनिक जाएंट गॅलक्सी (iconic Gaiety Galaxy) या थिएटरमध्ये दीपिका गेली होती. यावेळी दीपिकानं ऑल ब्लॅक लूक केला होता. ब्लॅक हुडी, टोपी आणि मास्क अशा लूकमध्ये दीपिका या थिएटमध्ये गेली होती. या थिएटमध्ये दीपिका काही वेळ थांबली आणि नंतर निघून गेली. आयकॉनिक जाएंट गॅलक्सीच्या बाहेरील दीपिकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा :  'मसुटा' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

पाहा व्हिडीओ: 


शाहरुखनं मन्नतच्या बाहेर दिली चाहत्यांना सरप्राइज

पठाणमधील दीपिका आणि शाहरुखच्या जोडीचं अनेकांनी कौतुक केलं.  रविवारी (28 जानेवारी) शाहरुखनं त्याच्या मन्नत या बंगल्या बाहेर येऊन चाहत्यांना सरप्राइज दिलं. यावेळी शहारुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. मन्नत बाहेरील व्हिडीओ शेअर करुन शाहरुखनं त्याला कॅप्शन दिलं,  ‘मेहमान नवाजी ‘पठान’ के घर पर… माझा रविवार खास केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.’


पठाण या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका यांच्यासोबतच जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाणनं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं ‘पठाण’ पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘टाईमपास…”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …