चिंगी ठरणार आनंदी राघवच्या जवळ येण्याचं कारणं; रमाच्या नाकाला झोंबणार मिरच्या?

मुंबई,  16 सप्टेंबर : झी मराठीवर नव्यानं सुरू झालेली नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. प्रेक्षकांना मालिका आवडतेय त्याचप्रमाणे मालिका ट्रोल देखील होतेय. पण एकूणच या मालिकेच्या निमित्तानं नवे चेहरे झी मराठीवर पाहायला मिळत आहेत. आनंदी आणि राघव यांचं लग्न झाल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान चिंगी आणि घरातील सगळ्यांची आनंदी घेत असलेली काळजी पाहून राघव देखील खुश आहे. मात्र रमाच्या आठवणीतून राघव बाहेर आलेला नाही. आनंदीनं मात्र तिच्या गोड स्वभावानं सर्वांची मनं जिंकली आहेत. राघव आणि आनंदीमधील जवळीक वाढताना दिसत आहे.

रमाच्या जाण्यानंतर राघवनं घरातील गणपती उत्सव बंद केला होता. मात्र आनंदीच्या येण्यानं सर्वकाही नव्यानं सुरू झालं. या सगळ्यात राघव आनंदीवर अनेकदा चिडला देखील. पण हळूहळू दोघांच्या नात्यातील दुरावा कमी होऊ लागला आहे.  रमानं कितीही आडकाठे आणले तरी आनंदी राघव मात्र जवळ येताना दिसणार आहेत.

हेही वाचा – Shreya Bugde: श्रेया बुगडेजवळ आहेत तब्बल इतक्या चप्पलच्या जोड; आकडा वाचून म्हणाल OMG
नवा गडी नवं राज्य मालिकेचा प्रोमो समोर आला आहे ज्यात आनंदी आणि राघव एकमेकांच्या जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या एकत्र येण्याचं कारण हे चिंगी ठरणार आहे. घरातील लाईट्स अचानक जातात. लाइट गेल्यानं चिंगी राघवला मोठ्यानं हाक मारते. तितक्यात आनंदी राघवची थडक होते. रात्रीच्या त्या अंधारात आनंदी आणि राघव नकळत एकत्र येतात आणि काही हळवे क्षण एजॉय करतात. यानिमित्तानं दोघांच्या सुरेख नात्याचा श्रीगणेशा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आनंदी आणि राघव हळूहळू एकत्र येऊ लागलेत खरं पण हे सगळं पाहून रमाच्या नाकाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबणार आहेत. रमा आधीपासूनच दोघांच्या संसारात लुडबुड करतेय. रमाच्या कारस्थानावर मात करुन आनंदी राघव कसे एकत्र येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …