CBSE बारावी टर्म १ निकाल होतोय जाहीर, जाणून घ्या अपडेट

CBSE 12th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) लवकरच बारावी बोर्ड टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर त्यांचे इंटरमिजिएट (इयत्ता १२ वी) निकाल पाहू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने (CBSE Board) निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे आणि आता कधीही जाहीर केला जाऊ शकतो. असे असले तरी सीबीएसईने टर्म १ निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘या’ वेबसाइटवर निकाल जाहीर
CBSE बोर्ड बारावी टर्म १ चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी त्यांचे गुण तपासू शकतील. सीबीएसई टर्म १ चा निकाल https://cbseresults.nic.in/,https://results.gov.in/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

CBSE Result 2022: एसएमएसच्या माध्यमातून तपासण्यासाठी आपल्या मेसेज बॉक्समध्ये cbse12 टाइप करुन हा मेसेज ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा. या क्रमांकावरुन सीबीएसई बारावीचा निकाल २०२२ पाहता येईल.

CBSE विद्यार्थ्यांना स्वत:च्या शाळेत परीक्षाकेंद्र मिळणार? बोर्डाकडून स्पष्टीकरण

CTET Results 2021: विद्यार्थ्यांना संताप अनावर, निकालासंदर्भात बोर्डाला विचारले प्रश्न
CBSE Result 2022: निकाल तपासण्यासाठी या गोष्टी जवळ ठेवा
सीबीएसई इयत्ता दहावी, बारावी टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, प्रवेशपत्र ओळखपत्र, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक आवश्यक असेल. निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी या गोष्टी सोबत ठेवाव्यात.

हेही वाचा :  Mughal History: अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

सीबीएसई लवकरच टर्म १ चा निकाल जाहीर करणार आहे. अहवालानुसार, ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ च्या निकालाची वाट पाहत आहेत. बोर्डातर्फे दहावी टर्म १ निकाल हा बारावी टर्म १ रिझल्टच्या आधी जाहीर केला जाईल.

करोना प्रादुर्भावामुळे सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. सीबीएसई टर्म १ दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या. तर देशभरात १ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत बारावी वर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

CBSE दहावी, बारावीचे निकाल डिजीलॉकर आणि उमंग अॅपवर ‘या’ प्रकारे तपासा
फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …