CBSE बारावी टर्म १ परीक्षांचा निकाल जाहीर

CBSE Term 1 Result 2021: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) लवकरच CBSE बारावी टर्म १ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरावा लागणार आहे. डिजीलॉकर आणि उमंग आणि एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. याचा सविस्तर तपशील बातमीत देण्यात आला आहे.

‘या’ वेबसाइटवर निकाल जाहीर
CBSE बोर्ड बारावी टर्म १ चा निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. सीबीएसई टर्म १ चा निकाल https://cbseresults.nic.in/ आणि https://results.gov.in/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावर क्लिक करुन तुम्ही निकाल पाहू शकता. निकाल लागल्यावर बहुसंख्य विद्यार्थी या वेबसाइटवर एकाच वेळेला निकाल पाहत असतात. त्यामुळे वेबसाइट हॅंग किंवा क्रॅश होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करु शकता.

CBSE दहावी, बारावीचे निकाल डिजीलॉकर आणि उमंग अॅपवर ‘या’ प्रकारे तपासा

ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार
CBSE Result 2022: डिजीलॉकर अॅपद्वारे तपासा
स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून ‘DigiLocker APP’ डाउनलोड करा.
स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, ‘सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

हेही वाचा :  मिश्र धातू निगम लिमिटेड अंतर्गत ट्रैनी पदांची भरती

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर बसेल भुर्दंड
CBSE Result 2022: उमंग अॅपवर तपासा
स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी ‘CBSE’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा.
स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

CBSE Result 2022: SMS च्या माध्यमातून तपासा
आपल्या मेसेज बॉक्समध्ये cbse12 टाइप करुन हा मेसेज ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा. या क्रमांकावरुन सीबीएसई बारावीचा निकाल २०२२ पाहता येईल.

अहवालानुसार, ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ च्या निकालाची वाट पाहत आहेत. बोर्डातर्फे दहावी टर्म १ निकाल हा बारावी टर्म १ रिझल्टच्या आधी जाहीर केला जाईल. करोना प्रादुर्भावामुळे सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. सीबीएसई टर्म १ दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या. तर देशभरात १ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत बारावी वर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

हेही वाचा :  NEET PG Counselling: सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिहीन डॉक्टरांना दिलासा

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये भरती
महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …