Eye Care: कॉन्टॅक्ट लेन्सेसची चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी टिप्स

शस्त्रक्रिया न करता चष्म्यापासून सुटका हवी असलेल्या लोकांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स हे खूप मोठे वरदान आहे. हल्लीच्या काळात कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर खूप वाढला आहे. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या बाबतीत काही विशेष काळजी देखील घ्यावी लागते. काळजी न घेता कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास डोळ्यांच्या पृष्ठभागाला मोठी इजा होऊ शकते. सुदैवाने आपण चांगल्या सवयी लावून घेऊन कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित सर्व धोके टाळू शकतो. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले, डॉ. विनायक अंकुश दामगुडे, फॅको, लॅसिक आणि कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जन, एएसजी आय हॉस्पिटल्स, डोंबिवली यांच्याकडून. (फोटो सौजन्य – iStock)

​कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित धोके​

​कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित धोके​
  • क्लेयर (कॉन्टॅक्ट लेन्स-इंड्यूस्ड अक्यूट रेड आय) – डोळे लाल होतात
  • खाज येणे
  • कॉर्नियल निओवस्क्युलरायझेशन – कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्यांची वाढ

​कॉन्टॅक्ट लेन्स कशा हाताळाव्या​

​कॉन्टॅक्ट लेन्स कशा हाताळाव्या​
  • कॉन्टॅक्ट लेन्सेस हाताळण्याच्या आधी तुमचे हात नीट स्वच्छ धुवा व कोरडे करा
  • सुकवण्यासाठी लिंट-फ्री टॉवेल वापरा
  • कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशनच वापरा
  • मॅन्युफॅक्चररने सुचवल्याप्रमाणे रब व रिंज तंत्राचा अवलंब करा
  • नेत्रचिकित्सकाने कॉन्टॅक्ट लेन्स जितका काळ वापरता येतील सांगितले असेल तितकाच काळ त्या वापरा. सर्वसामान्यतः दिवसभरात आठ तासांपर्यंत कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येऊ शकतात
हेही वाचा :  Old Pension : राज्यात जुन्या पेन्शनवरुन वादाला तोंड, नेमकी काय आहे 'ही' योजना ?

(वाचा – Debina Bonarjee: देबिनाला असा कोणता झाला आजार? दोन्ही लहान मुलींपासून राहावं लागतंय दूर )

​हे नक्की करा​

​हे नक्की करा​
  • कॉन्टॅक्ट लेन्स केसची नीट काळजी घ्या. केस वापरण्यापूर्वी योग्य प्रकारे स्वच्छ करून कोरडी करा
  • कॉन्टॅक्ट लेन्स केस दर तीन महिन्यांनी बदला
  • तुमच्यासोबत एक बॅक अप चष्मा सदैव असला पाहिजे. कॉन्टॅक्ट लेन्स काढाल तेव्हा किंवा काही इमर्जन्सी आल्यास त्याचा वापर करता येईल
  • तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य प्रकारे फिट बसतात याची खात्री करून घेण्यासाठी नियमितपणे नेत्रचिकित्सकांकडे जा
  • कॉन्टॅक्ट लेन्सेसमुळे कॉर्नियामध्ये विकृती येऊ शकते, त्यामुळे तुमच्या रिफ्रॅक्टीव्ह एररची तपासणी दरवर्षी करून घेणे महत्त्वाचे आहे.

(वाचा -रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या)

​हे करू नका​

​हे करू नका​
  • नळाच्या पाण्याने किंवा लाळेने कॉन्टॅक्ट लेन्सेस धुवू नका
  • कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात ठेवून झोपू नका. झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्सेस काढणे खूप गरजेचे आहे
  • शॉवर घेताना, पोहताना किंवा हॉट टब बाथ घेताना कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात असणे योग्य नाही
  • कॉन्टॅक्ट लेन्सेस स्वच्छ करण्यासाठी घरी तयार केलेले सलाईन वापरू नका
  • कॉन्टॅक्ट लेन्सेस कंटेनरचा पुनर्वापर करू नका किंवा त्यामध्ये अजून जास्त क्लीनिंग सोल्युशन पुन्हा भरू नका
  • कॉन्टॅक्ट लेन्सेस क्लिनिंग सोल्युशन दुसऱ्या बाटलीत भरू नका, असे केल्यास ते स्टेराईल राहणार नाही
  • तुमचे कॉन्टॅक्ट लेन्सेस इतर कोणालाही वापरायला देऊ नका, त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो
हेही वाचा :  या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करातील समस्येचा नाश

(वाचा – या कडू पदार्थापासून तयार केलेला हर्बल चहा, नसांमधून कोलेस्ट्रॉल करेल गायब)

​डोळ्यांसाठी घ्या कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी​

​डोळ्यांसाठी घ्या कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी​

कॉन्टॅक्ट लेन्सेसमुळे तुम्हाला चष्म्यापासून मुक्ती मिळू शकते, पण डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सेसची नीट काळजी घेणे खूप आवश्यक आहे. वरील उपायांचे पालन केल्यास डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो तसेच कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या वापराशी संबंधित इतर गुंतागुंत टाळता येते. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही त्रास होत असेल तर तातडीने नेत्रचिकित्सकाला दाखवा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …