CTET २०२१ च्या परीक्षेत २० लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. जे आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र निकालाला उशीर झाल्याने निराश आणि संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता ट्विटरवर आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी, सीबीएसई, सीटीईटी आणि इतर संबंधित संस्थांना टॅग करून, निकाल जाहीर करण्याच्या अधिकृत वेळ आणि तारखेबद्दल विचारणा करीत आहेत.
सीटीईटीचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता पण अद्याप जाहीर करण्यात आला नाही. याची कारणे काय आहेत? असा प्रश्न ट्विटरवर एका युजर्सने विचारला आहे. दुसर्या युजर्सने #ctetresult सह लिहिले की, आमच्या भावनांशी खेळणे थांबवा आणि ctet निकाल जाहीर करा. आणखी एका युजर्सने #CBSE, #ctetresult, #Irritation, #angry #Frustration टॅगसह CTET डिसेंबर २०२१ च्या निकालाची मागणी केली आहे. सीटीईटीचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आणि विलंबाचे कारण विचारणाऱ्या अशा पोस्ट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
CTET परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते २१ जानेवारी २०२२ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पेपर १ साठी १६ लाख ११ हजार ४२३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर पेपर २ साठी१४ लाख ४७ हजार ५५१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. सीबीएसईने १ फेब्रुवारी २०२२ रोजी बोर्ड सीटीईटी उत्तरतालिका जाहीर केली होती. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वेळ दिला होता. नवीन अपडेटसाठी उमेदवारांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

