‘डार्लिंग’ प्रभासच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले कथाकार! ‘राधे श्याम’मध्ये ऐकू येणार अमिताभ बच्

Radhe Shyam Update :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाचा भाग असणार आहेत. बिग बींकडे चित्रपटातील कथाकाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या वृत्ताला दुजोरा दिला. अमिताभ बच्चन यांच्या 1975मधील ‘दिवार’ या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. “#राधे श्यामच्या व्हॉइसओव्हरबद्दल शहेनशाह @SrBachchan धन्यवाद,” असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

एका मुलाखतीत दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी बिग बींना या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेण्याचे कारण स्पष्ट केले. “चित्रपट 1970च्या दशकात सेट करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला अशा आवाजाची गरज होती, जो भारदस्त वाटेल आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चांगला आवाज आणखी कोणाचा असेल? अमिताभ बच्चन, असा आवाज आहेत, ज्याला प्रत्येकजण ओळखतो, आदर करतो. राधे श्यामचे कथाकार म्हणून बिग बींचा सहवास लाभल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असे ते म्हणाले.

 


अमिताभ बच्चन, प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘महानती’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत

सध्या या चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’

या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला ‘प्रोजेक्ट के’ असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Aishwarya Rai Bachchan : अशी निरागस होती ऐश्वर्या; पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) …

Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा ‘लडकी : ड्रॅगन गर्ल’ चीनमध्ये होणार प्रदर्शित

Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर …