राजकारण

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. केडीएमसी प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याची चौकशी देखील करण्यात येत आहे.   कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड या मोहने ,अंबिवली, टिटवाळा प्रभाग क्षेत्र “अ”परिसरात पाहणी करत होत्या. याच वेळी धर्मेंद्र सोनवणे हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी दुचाकीवरून …

Read More »

अंबरनाथचे पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव

Ambarnath Honey Village : अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली असून गावात तसे फलकही गावात लावण्यास सुरूवात झाली आहेत. यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालं आहे.  अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत करण्यात आलेय. अंबरनाथ तालुक्यासाठी …

Read More »

कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना

Covid-19 JN1 : पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा …

Read More »

मोठा निर्णय! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार संरक्षण देणार; राहण्याचीही व्यवस्था करणार

Inter-caste Marriage : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. तसेच याबाबत अनेक कायदेशीर तरतुदी देखील आहेत. असे असताना देखील अेक ठिकाणी   ऑनर किलींग सारख्या घटना घडतात.  आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा संसार फुलण्याआधीच त्यांच्या सहजीवनाच्या वाटेवरच कुटुंबरुपी संकाटांचे काटेरी कुंपन तयार होते. यामुळेच ऑनर किलींग सारख्या घटना  रोखण्यासाठी सरकारने सुरक्षागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह …

Read More »

‘मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Politics: “अयोद्धेतील राममंदिराचे राजकारण भाजपने अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवले आहे. ते आपल्या संस्कृतीस शोभणारे नाही. हिंदुत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे व राममंदिराच्या सातबाऱ्यावर जणू आपलेच नाव लागले आहे, अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत पण राममंदिर उभे राहात असताना ‘रामराज्य’ मात्र रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट

BARTI Fellowship Exam: राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी  घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला होता.  2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा आला होता असा दावा केला जात आहे.   फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  फेलोशिपच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याने  ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   येत्या …

Read More »

महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

Covid Update: महाराष्ट्रात सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याची 28 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याचसोबत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. सर्वाधिक प्रकरणं मुंबई (77), ठाणे (29), रायगड (17) आणि पुण्यातील (23) आहेत. राज्यात करोनाचा नवा व्हेरियंट  JN.1 चा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले…

Devendra Fadanvis On covid Cases : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील याचा फैलाव (Maharastra Covid 19 Cases) होताना दिसतोय. अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात …

Read More »

फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; हट्ट जीवावर बेतला

Nagpur Balloon Cylinder Explosion : रंगीबेरंगी फुगे म्हणजे लहान मुलांच्या आकर्षणाचा दिवस. रस्त्यात फुगेवाला दिसला की मुलं पालकांकडे फुगे खरेदी करण्याचा हट्ट धरतात. मात्र, हाच फुगे खरेदीचा हट्ट एका  चिमुरड्याच्या जीवावर बेतला आहे. गॅसच्या फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नागपूरच्या सदर पोलीस …

Read More »

‘तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,’ अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, ‘माझा पक्ष…’

शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी आमच्या काळात चर्चा करुन निर्णय घेतले जात होते. निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये तक्रार करण्यासाठी जागा नसायची असं म्हटलं आहे. तसंच पक्षाची निर्मिती कोणी केली? पक्षाचे संस्थापक कोण …

Read More »

‘ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात…’; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका

Shalinitai Patil Slams Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सरकारमध्ये सहभागी झालेल्या गटाचं नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता पवारांच्या बंडाबद्दल भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या विधानाचा आता शालिनीताई पाटील यांनी समाचार घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचं बंड फार वेगळं असल्याचं सांगताना शालिनीताईंनी अजित पवारांवर …

Read More »

‘हे आपलं शेवटचं आंदोलन’; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन रविवारी संपली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारला कोणतीही ठोस घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

‘पुणेकरांना प्यायला…’; अजित पवारांचं राज्यातील पाणीटंचाई संदर्भात विधान; धरणांचाही केला उल्लेख

Water Shortage In Dams Of Maharashtra: नवीन वर्षामध्ये राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ 63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठ्यात 20 टक्क्यांची घट झाली आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाणी टंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही आकडेवाडी दिवसागणिक वाढतेय. याच …

Read More »

पुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला अटक केली आहे. पुण्यातील …

Read More »

‘कमळाबाईशी ‘निकाह’ लावलेल्या मंडळींचा…’, शिंदे-पवार गट भाजपामुळे अस्वस्थ असल्याचा दावा

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar Group: “महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दांचा व स्वाभिमान्यांचा आहे. तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा तो नाही. लढण्याआधीच या लोकांनी शस्त्र ठेवली. जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ नयेत. लढून हरणाऱ्यांनाही महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी व पदे वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली, पण हा …

Read More »

मुंबई महानगरपालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार

CM Eknath Shinde : स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. याच भावनेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राइव्ह सुरु केली आहे. त्याद्वारे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होत आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एकूणच स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्‍वी होत असून हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री . एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई महानगरातील सर्व रस्‍ते काँक्रिटकरणाचे …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला भाजपचा मेगाप्लॅन; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आहे, लागलीच विधानसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुका होऊ शकतात. मात्र त्याचदरम्यान एका बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ माजवलीय. भाजप लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.  उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळाल्यामुळे भाजपला दहा हत्तींचं बळ आलंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी आणि भाजपचं नाणं …

Read More »

दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले (Akole) तालुक्यात सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेली सांधण व्हॅली (sandhan valley) नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आली आहे. अनेक ट्रेकर्स सांधणच्या घळीतून उतरणारा ट्रेक करत अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडत असतात. भंडारदरा धरणालगत सांम्रद गावापासून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पण …

Read More »

Ajit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!

Fourth Women Policy in Maharastra : अनेकदा सोशल मीडियावर आपण काही युझर्सची नावं चार शब्दांची पाहतो. काहीजण आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव देखील आपल्या नावात लावतात. तर गेल्या काही दिवसात अधिकृत कागदपत्रांवर देखील आई आणि वडिलांचं नाव संपूर्ण नावात लावण्याचा कल तरुणाईमध्ये दिसून येतोय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक मोठी घोषणा (Ajit Pawar announcement In baramati) केली …

Read More »

भायखळा जेलमधील महिला कैदी बनली रेडिओ जॉकी

Marathi News : कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला बंदी रेडिओ जॉकीचे काम करत आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,अमिताभ गुप्ता यांचे शुभहस्ते भायखळा जिल्हा कारागृह येथे महिला विभागामध्ये महिला बंद्यांच्या मनोरंजनाकरीता “FM रेडीओ सेंटर” चे उद्घाटन करण्यात आले आहे. सदर FM रेडिओ सेंटर मध्ये पहिल्यांदाच कारागृहातील महिला बंद्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.  भायखळा जिल्हा कारागृहातील (महिला) बंदी …

Read More »