पुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला अटक केली आहे.

पुण्यातील कात्रज भागात हा सगळा विचित्र प्रकार घडला आहे. जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिची हत्या केली आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केले होते. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने माथेफिरूने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे.

माधुरी कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तानाजी कांबळे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तानाजी कांबळेवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी तानाजी कांबेळ याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :  पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत साधायचा जवळीक, शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी कांबळे हा व्यवसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. तानाजी कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने माधुरी हिच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या. या बेदम मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

लग्नात घुसून नवरदेवावर कोयत्याने वार

पिंपरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमानंतर पंगतीतून बाईकवर ये-जा करण्यास मनाई केल्याने तिघांनी नवरदेवावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करत ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागाल तर तुमची विकेट टाकीन’ अशी धमकी आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी विजय राहुल तलवारे, सनी राजीव गायकवाड, अनिकेत बापू बनसोडे यांना अटक करण्यात आली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …