नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या; भाजपा आमदार लांडगे यांची जीभ घसरली


नवाब मलिक सारख्या देशद्रोह्याला भारतातील कुठलाच नागरिक कधीच माफ करणार नाहीत

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची जीभ मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना घसरली आहे. मंत्री नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या अस वक्तव्य आमदार महेश लांडगे यांनी केलं असून नवाब हे देशद्रोही आहेत त्यांना भारतातील नागरिक कधीच माफ करणार नाहीत अस एकेरी उल्लेख करत म्हटलं आहे. आमदार महेश लांडगे आणि कार्यकर्ते हे मलिक यांचा राजीनामाच्या मागणीसाठी एकत्र आले होते. तेव्हा त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत. यावेळी, भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नवाब मलिक राजीनामा द्या, राजीनामा द्या, भारत माता की जय, भंगारवाल्या नवाब मलिक चा धिक्कार असो. भंगारवाल्याचे करायचे काय? खाली डोके वर पाय. अशा घोषणा दिल्या.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाविकास आघाडीतील कोणत्या ना, कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्ट्राचाराचे आरोप होत आहेत. नवाब मलिक यांच्यावर जो आरोप आहे. हा या हिंदुस्थानमधील नागरिक सहन करणार नाहीत. असा गंभीर आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. मुंबई मधील नागरिकांना 1993 मधील बॉम्ब स्फोटाबद्दल, जातीय दंगलीबद्दल किंबहुना दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड डॉन च्या दहशतीबद्दल विचारलं तर मुंबई मधील नागरिक आज सुद्धा भयभीत होतात. ते दृश्य त्यांना परत नकोय. अशा बॉम्ब स्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांना, हाथ असणाऱ्या लोकांना दाऊद सारख्या एका देशद्रोहाच्या संबंध ठेवलेल्या या मंत्र्याला अटक करून चालणार नाही तर भर चौकात फाशी दिली पाहिजे. अस वक्तव्य आमदार लांडगे यांनी केलं आहे.

हेही वाचा :  मंत्रालयात कधीपासून काम सुरू करणार? अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मी पुन्हा…”!

पुढे ते म्हणाले की, जाती धर्माच राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. पण, आरोप भारतीय जनता पक्षावर लावले जात आहेत. आज दिग्गज नेते नबाव मलिक यांच्या समर्थानात उतरले आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्याच समर्थन करतायेत तो हा भारत देश सोडून गेला. तो तुम्हाला विचारून गेला होता का? दाऊद च्या समर्थनात, बरोबर काम करणारा नवाब मलिक आज ईडी च्या चौकशीत आहे. तर, तो दाऊद भारताबाहेर गेला त्याला कारणीभूत तुम्ही आहात का? असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणून, नवाब मलिक सारख्या देशद्रोह्याला भारतातील कुठलाच नागरिक माफ करणार नाही. त्याचा राजीनामा सरकार घेईल किंवा न घेईल पण त्याला या देशातील कुठलाच नागरिक माफ करणार नाही. नवाब मलिक यांचे दाऊद बरोबर संबंध असल्याचं पुराव्यानिशी जाहीर झाल आहे. अस देखील आमदार लांडगे यांनी म्हटलं आहे.

The post नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या; भाजपा आमदार लांडगे यांची जीभ घसरली appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …