मनोरंजन

न्यासा देवगणच्या ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलनं सोडलं मौन

Nysa Devgn: अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा देवगण (nysa devgn) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो न्यासा सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी न्यासानं एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमधील न्यासाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. न्यासाचे या दिवाळी पार्टीमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

IFFI : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

International Film Festival : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा …

Read More »

‘ए मुर्खा… हिंमत असेल तर इथे ये’, शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल

Sharad Ponkshe: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. तसेच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं. आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमधील व्हिडीओ शेअर करुन शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी राहुल …

Read More »

Snehlata Vasaikar : ‘जागतिक पुरुष दिना’निमित्त स्नेहलता वसईकरची खास पोस्ट

Snehlata Vasaikar On International Mens Day : मराठमोळी अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’मुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. आज ‘जागतिक पुरुष दिना’निमित्त (International Men’s Day) तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.  पतीचा आणि भावाचा फोटो शेअर करत स्नेहलताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलं आहे,”असं म्हणतात, की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मी …

Read More »

Atal : अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी!

Pankaj Tripathi On Movie Atal : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित ‘अटल’ (Atal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमात पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.  …

Read More »

हृतिक रोशन आणि सबा आझाद राहणार ‘मन्नत’मध्ये?

Hrithik Roshan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.  हृतिक आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या जोडीबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, सबा आणि हृतिक हे डेट करत आहेत. लवकरच हृतिक आणि सबा हे एका नव्या घरामध्ये शिफ्ट होणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.  मुंबईमध्ये घेतलं आलिशान घररिपोर्टनुसार, मुंबईमधील …

Read More »

‘या’ अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका!

Indira Gandhi Birth Anniversary : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची आज जयंती आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पंतप्रधान या नात्याने त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांना ‘आर्यन लेडी’ असेही म्हटले जाते. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात ‘ऑंधी'(Aandhi), ‘बेल बॉटम’ अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमात अनेक अभिनेत्रींनी …

Read More »

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘गॉडफादर’

Godfather: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट 5 ऑक्टोबर प्रेक्षकांच्या भेटीस आला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.  गॉडफादर हा चित्रपट नेटफ्लिक्स …

Read More »

जाणून घ्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या ‘बादशाह’ बद्दल

Rapper Badshah Birthday: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आज (19 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस आहे. बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीमध्ये (Delhi) झाला. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. जाणून घेऊयात बादशाहच्या संपत्तीबाबत तसेच करिअरबाबत… बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती बादशाहने 2006 …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 2’ ची बंपर ओपनिंग!

Drishyam 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट काल (18 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  …

Read More »

Manasi Naik : घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने अप्रत्यक्षरित्या सोडलं मौन

Manasi Naik : मराठी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अखेर मानसीने अप्रत्यक्षरित्या या चर्चांवर मौन सोडलं आहे.  मानसीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”आयुष्यात आपल्याला कायम साथ देणारे, आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे अनेक मित्र येतात. तुम्हाला आहे तसं ते स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात …

Read More »

Happy Birthday Zeenat Aman : 70 च्या दशकात सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख!

Zeenat Aman : सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलं होतं. तसेच झीनत यांनी ‘फेमिना मिस इंडिया’ आणि ‘मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल’ हे किताब जिंकले आहेत.  झीनत यांचे गाजलेले सिनेमे – ‘हलचल’ या सिनेमाच्या माध्यमातून झीनत यांनी बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं. त्यानंतर झीनत यांची सिनेसृष्टीतली गाडी सुसाट …

Read More »

Happy Birthday Sushmita Sen : आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी सुष्मिता सेन!

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा (Miss India) किताब जिंकला होता. तसेच ती त्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’देखील झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे.  सुष्मिताचा पहिलाच सिनेमा फ्लॉप सुष्मिता 1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर पहिल्यांदा चर्चेत आली. सुष्मिताने बॉलिवूड अभिनेत्री …

Read More »

Goshta Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘गोष्ट एका पैठणीची’चा ट्रेलर आऊट

Goshta Eka Paithanichi : ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान मिळाला आहे. आता सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास उलगडणाऱ्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘गोष्ट एका पैठणीची’ सिनेमाचं कथानक काय? प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात, …

Read More »

Shraddha Murder Case : सिने-निर्मात्याने बॉलिवूड सेलिब्रिटींवर साधला निशाणा

Ashoke Pandit On Shraddha Walkar : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं तिची गळा दाबून हत्या केली. त्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले आणि त्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावायला सुरुवात केली. या प्रकरणावर देशातील नागरिकांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान सिने-दिग्दर्शक अशोक पंडितने (Ashoke Pandit) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया …

Read More »

Drishyam 2 Movie Review : खिळवून ठेवणारा ‘दृश्यम 2’

दृश्यम 2 Crime – Thriller Director: Abhishek Pathak Starring: अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन, इशिता दत्ता Drishyam 2 Movie Review  : ‘दृश्यम’ (Drishyam 2) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करू लागले. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुळात या सिनेमाच्या यशाचं श्रेय या सिनेमाच्या कथेला …

Read More »

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता…’ फेम चंपक चाचांना सेटवर दुखापत

Amit Bhatt in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेतील ‘चंपक चाचा’ म्हणजेच ‘बापूजी’ अर्थात अमित भट्ट (Amit Bhatt) यांना मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे.  …

Read More »

Daljeet Kaur Passes Away : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर काळाच्या पडद्याआड

Daljeet Kaur Passes Away : पंजाबी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबच्या अनेक सुपरहिट सिनेंमात दलजीत मुख्य भूमिकेत होत्या. तसेच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतदेखील काम केलं आहे.  दलजीत कौर यांनी 10 पेक्षा अधिक हिंदी आणि 70 पेक्षा जास्त पंजाबी सिनेमांत काम केलं आहे. दिल्लीच्या …

Read More »

India Lockdown : आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक

Prateik Babbar On Smita Patil : हिंदी सिने-सृष्टीतील दिग्गज अभिनेते राज बच्चर यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) सध्या ‘इंडिया लॉकडाउन’ (India Lockdown) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रतीक बब्बर त्याच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना श्रद्धांजली वाहणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली …

Read More »

Nawazuddin Siddiqui : ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार नवाजुद्दीन सिद्धीकी!

Nawazuddin Siddiqui plays transgender Role in Haddi : नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून ‘हड्डी’ (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले असून नवाजुद्दीनच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.  नवाजुद्दीनचा लूक काय आहे? पोस्टरमधील हिरव्या रंगाची काठापदराची साडी, डोळ्यात काजळ, ओठावर गडद रंगाची लिपस्टिक, कपाळावर टिकली, कानात झुमके, …

Read More »